Alia Bhatt साठी फोटोग्राफर बनला Ranbir Kapoor, पहा फोटो

रणबीरने आलियाचे काढलेले सुंदर फोटो पाहून आलियाची सासू म्हणजेच रणबीरची आई नीतू यांनीही फोटोवर रिअँक्शन दिली आहे. नीतू कपूर यांनी कमेंटमध्ये हार्ट आणि आय हार्ट इमोजी शेअर करत आलियासाठी प्रेम व्यक्त केले आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  नव्या वर्षात लग्न करणार आहे. दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आले मात्र दोघांनीही त्याच्या नात्याचा खुलासा केलेला नाही. दोघेही कामातून ब्रेक घेऊन न्यू इअर सेलिब्रेशनसाठी आफ्रीकेला गेले आहेत. दोघे एकमेकांसोबत तिथे क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत. दोघांची मज्ज मस्ती दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहेत. यावेळी पहिल्यांदा आलियाने रणबीरला बॉयफ्रेंड असे मेंशन करत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आलिया भट्ट सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. आफ्रिकेच्या न्यू इअर सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो आलियाने शेअर केले आहेत. ‘बॉयफ्रेंडच्या फोटोग्राफी स्किल्स’, असे कॅप्शन देत आलियाने तिचे रणबीरने काढलेले काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोंमधील विनामेकअप आलियाने सर्वांनाची मने जिंकली आहेत. आलियाने पहिल्यांदा सोशल मीडियावर रणबीरला बॉयफ्रेंड म्हटल्याचे पाहून सर्वांनाच आनंद झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

 

रणबीरने आलियाचे काढलेले सुंदर फोटो पाहून आलियाची सासू म्हणजेच रणबीरची आई नीतू यांनीही फोटोवर रिअँक्शन दिली आहे. नीतू कपूर यांनी कमेंटमध्ये हार्ट आणि आय हार्ट इमोजी शेअर करत आलियासाठी प्रेम व्यक्त केले आहे. आलिया आणि नीतू कपूर यांच्यात फार छान बॉडींग आहे हे सर्वांनाच माहिती आहे. या सासू सूना नेहमी अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असतात. रणबीरचे वडील म्हणजेच दिवगंत अभिनेते ऋषि कपूर यांनाही आलिया भट्ट फार आवडायची.

रणबीर आणि आलिया यांचे नाते आता सर्वश्रृत आहे. आलिया रणबीरच्या घरी येत जात असते. दिवाळी देखील आलियाने रणबीरच्या कुटुंबासोबत सेलिब्रेट केली होती. आलियाचे तिच्या सासरच्या मंडळींसोबत फार छान नाते आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे.

प्रेक्षक आता या जोडीला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. आलिया आणि रणबीरचा ब्रम्हास्त्र या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमात आलिया रणबीर यांच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि मौनी रॉयही प्रमुख भूमिकेत असणार आहेत.


हेही वाचा – Diwali 2021: दिवाळीच्या मुहूर्तावर आलिया- रणबीरने घेतलं कालिमातेचं दर्शन