घर दिवाळी २०२१ लग्न होताच रणबीर-आलियाची एकूण संपत्ती झाली 'इतकी'; दोघांपैकी कोण जास्त कमवतं? जाणून...

लग्न होताच रणबीर-आलियाची एकूण संपत्ती झाली ‘इतकी’; दोघांपैकी कोण जास्त कमवतं? जाणून घ्या

Subscribe

बॉलिवूडमधील दोन मोठे सेलिब्रिटी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट काल, गुरुवारी लग्नबंधनात अडकले. दोघेही बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रिटींच्या यादीत आहेत. रणबीर-आलिया दोघेही चित्रपटसाठी भरपूर मानधन घेतात. याशिवाय जाहिरातींमधूनही रणबीर-आलिया कमवतात. त्यामुळे सध्या लग्नानंतर दोघांची संपत्ती एकूण मिळून किती झाली? यावर चर्चा रंगली आहे.

एका चित्रपटासाठी रणबीर घेतो इतके मानधन

माहितीनुसार, रणबीर कपूरजवळ ३३२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. वेकअप सिड आणि राजनीतिपासून ते रॉकस्टार आणि बर्फीसारखा हिट चित्रपट देणारा रणबीर कपूर एका चित्रपटासाठी १८ ते २० कोटी रुपयांचे मानधान घेतो. तसेच रणबीर कपूर जाहिरातीसाठीही कोट्यवधीचे मानधन घेतो. रणबीरकडे याव्यतिरिक्तही कमवण्याचे इतर मार्ग आहेत. त्याने काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यातून रणबीर कमवतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by ASIAN WEDDING MAG (@asianweddingmag)

 रणबीरकडे ‘या’ आहेत लक्झरी गाड्या

- Advertisement -

चित्रपटसृष्टीतील दिग्गज कपूर घराण्याचा वंशज असलेला रणबीर कपूरजवळ बऱ्याच महागड्या लक्झरी गाड्या आहेत. रणबीरकडे ऑडीपासून मर्सिडीज आणि रेंज रोवरच्या अनेक गाड्या आहेत. रणबीरच्या गॅरेजमध्ये सर्वात महागडी गाडी Mercedes Benz AMG G-63 आहे, या गाडीची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. याशिवाय रणबीरजवळ २.७० कोटी रुपयांची Audi R8, २.११ कोटीची Range Rover Vogue, १.५८ कोटीची Audi A8L आणि १.४३ कोटींची Range Rover Sports अशा अनेक गाड्या आहेत. माहितीनुसार, रणबीरकडे Lexus, BMW X6, Audi RS7 आणि Toyota Land Cruiserसारख्याही गाड्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmy Panga ™️ (@filmypanga)

 इतक्या संपत्तीची मालकीण आहे आलिया

आलियाच्या एकूण संपत्तीबाबत बोलायचे झाले तर ती रणबीर कपूरपेक्षा खूप मागे आहे. आलियाची एकूण संपत्ती १५० कोटींहून अधिक आहे. आलियानेही रणबीरप्रमाणे अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. आलिया एका चित्रपटासाठी ५ ते ८ कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय ती जाहिरातीसाठी १ ते २ कोटी रुपये घेते. अशाप्रकारे रणबीर-आलियाच्या लग्नानंतर दोघांची एकूण संपत्ती ५००हून अधिक कोटी रुपये झाली आहे.

- Advertisement -

रणबीरप्रमाणे आलियालाही लक्झरी गाड्यांची आवड आहे. आलियाकडे Land Rover ची Range Rover Vogue 4 गाडी आहे, ज्याची किंमत २ कोटी रुपयांहून अधिक आहे. याशिवाय तिच्याजवळ १.३९ कोटी रुपयांची BMW 7 Series, ८० लाख रुपयांची Audi Q7, 60 लाख रुपयांची Audi A6 आणि ५० लाखांची Audi Q5सारख्या महागड्या गाड्या आहेत.


हेही वाचा – Ranbir Kapoor, Alia Bhatt Wedding : आलिया रणबीर थिरकले मलायकाच्या पॉप्युलर गाण्यावर; व्हिडिओ व्हायरल…


 

- Advertisment -