Gangubai Kathiawadi: गंगूबाई काठियावाडीचं नवं पोस्टर रिलीज, आलियाचा कातील लूक पुन्हा एकदा व्हायरल

पोस्टरमध्ये आलिया भट्ट बिछान्यावर बसली असून तिने सफेद साडी आणि डोळ्यात मोठे काजळ भरले आहे. कपाळावर लावलेल्या मोठ्या लाल टिकलीने आलियाच्या लूकला चार चाँद लावले आहेत.

alia bhatt sanjay leela bhansali Gangubai Kathiawadi new poster trailer release on 4 February 2022
Gangubai Kathiawadi: गंगूबाई काठियावाडीचं नवं पोस्टर रिलीज, आलियाचा कातील लूक पुन्हा एकदा व्हायरल

अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt)  बहुप्रतिक्षीत गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या सिनेमाचा ट्रेलर येत्या ४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. सिनेमाचे अनेक पोस्टर आजवर रिलीज झालेत. सिनेमा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा लांबणीवर पडला होता. संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी सिनेमा अखेर २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केल्यानंतर निर्मात्यांनी आता सिनेमाच्या ट्रेलरची घोषणा केली आहे. ट्रेलरच्या रिलीज डेटची षोषणा करत सिनेमाचे नवीन पोस्टर देखील लाँच करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

नवीन पोस्टर शेअर करत आलिया म्हटलेय, ‘गंगू येत आहे… ४ फेब्रुवारीला ट्रेलर रिलीज होईल’. पोस्टरमध्ये आलिया भट्ट बिछान्यावर बसली असून तिने सफेद साडी आणि डोळ्यात मोठे काजळ भरले आहे. कपाळावर लावलेल्या मोठ्या लाल टिकलीने आलियाच्या लूकला चार चाँद लावले आहेत. आलियाचा हा कातीनाला अंदाज प्रेक्षकांना भलताच आवडला आहे.

लेडी डॉनची भूमिका निभावणार आलिया भट्ट

गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा माफिया क्विन गंगूबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आलिया गंगूबाईंच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मुंबईच्या कामाठिपुरा परिसरातील गंगूबाई ते माफिया क्विन असा प्रवास सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या द माफिया क्विन ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारीत आहे.

Video: गंगूबाई काठियावाडी यांची खरी कहाणी

गंगूबाई काठियावाडी या सिनेमा याआधी १८ फेब्रुवारीला रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सिनेमा पुढे ढकलण्यात आला. अखेर कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर २५ फेब्रुवारीला सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 25 फेब्रुवारीला सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाचा प्रीमियर प्रतिष्ठित 72व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे.


हेही वाचा – Gangubai Kathiawadi Release date: अखेर ‘या’ दिवशी रिलीज होणार आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’