घरताज्या घडामोडीट्रोलिंगवर पहिल्यांदाच व्यक्त झाली आलिया, फोटो शेअर करत म्हणाली!

ट्रोलिंगवर पहिल्यांदाच व्यक्त झाली आलिया, फोटो शेअर करत म्हणाली!

Subscribe

अभिनेता सुशांतसिंग राजपुतच्या आत्महत्येनंतर नेटकऱ्यांमी स्टार किड्सला ट्रोल करायसा सुरूवात केली आहे. विशेष करुन आलिया भट्ट आणि तिच्या कुटुंबीयांवर टीका केली जात होती. रिया आणि महेश भटट् यांच्यात सुशांतचे घर सोडल्यानंतर झालेल्या व्हॉट्स चॅटचे मेसेज बाहेर येताच तर महेश भट्ट आणि आलिया भट्टला नेटकरी ट्रोल करत आहेत. याचाच परिणाम नुकताच प्रदर्शित झालेल्या सडक २ वर दिसून आला. या ट्रोलिंगनंतर आलिया पहिल्यांदाच व्यक्त झाली असं म्हणायला हरकत नाही.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी ट्रोलिंगला कंटाळून आलियाने तिचा कमेंट बॉक्स लिमिटेड केला होता. पण आता आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यावर आता पुन्हा तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. आलियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती या सिंपल लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

हा फोटो शेअर करत आलियाने अमेरिकन कवीयांचा कोट शेअर केला आहे. ‘कधी कधी ज्या गोष्टी घडत असतात त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पण या सर्वामुळे तुम्ही स्वत:ला कमी लेखू नका’ या आशयाची पोस्ट तिने केली आहे.

- Advertisement -

आलियाच्या ‘सडक २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच पहिल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक डिसलाइक मिळालेला ट्रेलर ठरला होता. त्यामुळे आता चाहत्यांनी आलियाच्या पोस्टवर कमेंट करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -