Brahmastra First Look : ब्रम्हास्त्रचा फर्स्ट लूक आऊट ! वाढदिवशी आलियाचं चाहत्यांना खास गिफ्ट

आलियाचा गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या सिनेमा चांगलचा गाजला. गंगूबाईच्या यशानंतर आलिया आता ब्रम्हास्त्र (Brahmastra ) घेऊन सज्ज झाली आहे.

alia bhatt stare Brahmastra First Look out from brahmastra watch teaser
Brahmastra First Look : ब्रम्हास्त्रचा फर्स्ट लूक आऊट ! वाढदिवशी आलियाचं चाहत्यांना खास गिफ्ट

 Brahmastra First Look : बॉलिवूडची गॉर्जियस अभिनेत्री आलिया भट्टने (alia bhatt ) तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशी आलियाने तिच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं. आलियाचा गंगूबाई काठियावाडी या सिनेमा चांगलचा गाजला. गंगूबाईच्या यशानंतर आलिया आता ब्रम्हास्त्र घेऊन सज्ज झाली आहे. आज आलियाच्या वाढदिवशी ब्रम्हास्त्रचा टीझर ( फर्स्ट लूक) रिलीज करण्यात आला. आलिया सिनेमात ईशा ही भूमिका साकारणार आहे. सिनेमातील आलियाचा लूक फार अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. (alia bhatt starer Brahmastra First Look out from teaser )

ब्रम्हास्त्रच्या टीझरमध्ये आलिया फार इंटेंस आणि सिरीयस लूकमध्ये दिसत आहे. आलियाचा हा लूक पाहून सिनेमात आलियाच्या वेगवेगळ्या शेड्स पाहायला मिळणार असे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

“हॅपी बर्थ डे टू मी. तुम्हाला ईशाला भेटण्यासाठी याहून चांगला दिवस आणि चांगला मार्ग असू शकत नाही. अयान मेरे वंडर बॉय आय लव्ह यू. थँक्यू #Brahmastra” असे कॅप्शन देत आलियाने ब्रम्हास्त्रचा टीझर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

अयान म्हणजेच ब्रम्हास्त्र सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनीही आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. “हॅपी बर्थ डे लिटिल वन. जॉय, प्राइड, इंस्पिरेशन आणि मॅजिक. तुझ्या वाढदिवशी तुझ्यासाठी इथे काही तरी खास आहे”, असे म्हणत त्यांनी आलियाला शुभेच्छा दिल्यात त्याचप्रमाणे सिनेमाचा टीझरही शेअर केला आहे. “आमची ईशा. ब्रम्हास्त्रची शक्ती” असेही त्यांनी आलियाने म्हटलेय.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या ब्रम्हास्त्र सिनेमाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. आलिया आणि रणबीर पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. दोघांच्या रिलेशनशिपमुळे हा सिनेमा पाहण्यासाठी दोघांचे फॅन्स जरा जास्तच उत्साही आहेत. ब्रम्हास्त्र ९ सप्टेंबर २०२२ ला रिलीज होणार आहे. हिंदी तसेच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा – The Kashmir Files प्रमोट करण्यासाठी Kapil Sharma ने दिला नकार ? अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य