घरताज्या घडामोडीGangubai Kathiawadi Release date: अखेर 'या' दिवशी रिलीज होणार आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी'

Gangubai Kathiawadi Release date: अखेर ‘या’ दिवशी रिलीज होणार आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’

Subscribe

आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. भन्साळी प्रोडक्शनकडून ट्विटद्वारे सिनेमाच्या नव्या रिलीड डेटची माहिती देण्यात आली आहे. संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमासाठी प्रचंड मेहनत आणि पैसा खर्च केला आहे. त्यामुळे हा सिनेमा हीट होणार यात काही शंका नाही.

अभिनेत्री आलिया भट्टच्या ( Alia Bhatt)  बहुप्रतिक्षीत गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या नवीन रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. (Gangubai Kathiawadi Release date)  मागच्या एक वर्षांपासून गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज होता. मात्र कोरोना महामारिमुळे सिनेमा फार लांबणीवर पडला. मात्र कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून अनेक राज्यातील सिनेमागृहे खुली करण्यात आली आहेत. त्यामुळेच सिनेमाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. भन्साळी प्रोडक्शनकडून ट्विटद्वारे सिनेमाच्या नव्या रिलीड डेटची माहिती देण्यात आली आहे. संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमासाठी प्रचंड मेहनत आणि पैसा खर्च केला आहे. त्यामुळे हा सिनेमा हीट होणार यात काही शंका नाही. प्रेक्षक सिनेमाला किती प्रतिसाद देतात हे सिनेमा रिलीज झाल्यावरच समजणार आहे.

- Advertisement -

गंगूबाई काठियावाडी या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अभिनेत्री आलिया भट्ट सिनेमात गंगूबाईची मुख्य भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या शुटींगदरम्यान सेटवर कोरोनाने शिरकाव केला होता. त्यामुळे शुटींग लांबणीवर गेले होते. मागील वर्षी सिनेमाचे शुटींग पूर्ण झाल्यानंतर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात 18 फेब्रुवारी 2022 ही रिलीज डेट घोषित करण्यात आली मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिनेमा पुढे ढकलण्यात आला आणि आता 25 फेब्रुवारीला सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाचा प्रीमियर प्रतिष्ठित 72व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे.

आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी या सिनेमा अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. माफिया क्वीन गंगूबाई यांच्या आयुष्यावर हा आधारित हा सिनेमा असून आलिया भट्ट यात गंगूबाईंच्या मुख्य भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे अभिनेता अजय देवगण देखील सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये आलियाचा बोल्ड अवतार आणि दमदार डायलॉग ऐकून सिनेमाप्रती प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Madhuri Dixitचं OTT वर पदार्पण! ‘या’ वेब सिरीजमध्ये करणार काम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -