Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रणबीर पाठोपाठच आलियालाही कोरोनाने गाठले

रणबीर पाठोपाठच आलियालाही कोरोनाने गाठले

अभिनेत्री आलिया भट होम क्वारंटाईनमध्ये घेते उपचार

Related Story

- Advertisement -

राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्वीपेक्षा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. लोकप्रतिनिधींना तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. रणबीर कपूरनंतर आता अभिनेत्री आलिया भटला कोरोनाची लागण झाली आहे. आलियाने कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत आलियाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. बॉलिवूडमध्येही जास्त प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अमिर खानला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

अभिनेत्री आलिया भटने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले आहे. माझी कोव्हिड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. स्वतःला होम क्वारंटाईन केले असून सर्व नियमांचे पालन करत आहे. तुम्हा सर्वांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद अशी पोस्ट आलिया भटने केली आहे.alia bhatt tested corona positive and get treatment under home quarantine

- Advertisement -

मागली काहीदिवसांपूर्वी अभिनेता मिलिंद सोमन, आर.माधवन,अमिर खान,रणबीर कपूर,कार्तिक आर्यन,रोहित सराफ,सिद्धांत चतुर्वेदी,मनोज वाजपेयी,रणबीर शौरी तसेच इतर काही अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता बॉलिवूडला कोरोनाचा विळखा बसला आहे.

आलिया भटचा आगामी हिंदी चित्रपट ब्रम्हस्त्रमध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत असणार आहे. तसेच दाक्षिणात्य अभिनेता राम चरण सोबत आरआरआर चित्रपट येणार आहे. संजय लीला भन्सालीचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट जूनपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -