घरमनोरंजनआलियाने केलं लैंगिक समानतेवर भाष्य; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

आलियाने केलं लैंगिक समानतेवर भाष्य; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या आलिया तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे. शिवाय याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी आलियाला एका फॅशन ब्रँडची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आलं. नुकतीच आलिया या फॅशन ब्रँडच्या एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती ज्यावेळी तिने तिथे एक भाषण केले, ज्यानंतर तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. सध्या आलियाच्या या इव्हेंटमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती लैंगिक समानतेवर भाषण देताना दिसत आहे. आलियाचं हे भाषण ऐकून नेटकरी तिला ट्रोल करु लागले आहेत.

काय म्हणाली नक्की आलिया?

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

सोमवारी पार पडलेल्या या इव्हेंटमधील व्हिडीओ एका वापरकर्त्याने शेअर केला. ज्यात आलिया म्हणतेय की, “जर एक स्त्री सशक्त आहे. जर ती स्वतः प्रोडक्टीव असेल, तर ती घरात, तिच्या मुलांसाठी, समाजासाठी, तिच्या देशासाठी प्रोडक्टीव असेल आणि त्यासाठी ती आवश्यक आहे. स्त्रीसोबत. गुंतलेल्या प्रत्येकावर परिणाम होतो.”

- Advertisement -

दरम्यान, आलियाच्या हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. ज्यात एकाने लिहिलंय की, खूप चांगला रट्टा मारला आहे. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “असं वाटतंय ती स्क्रिप्ट वाचत आहे.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप चांगली तालीम केली पण आत्मविश्वासाचा अभाव आहे.”

- Advertisement -

आलिया झाली Gucci जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर

Gucci ने काही दिवसांपूर्वी आलिया भट्टला आपल्या ब्रँडची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे . अलीकडेच, अभिनेत्री दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे गेली होती, जिथे तिने Gucciच्या कार्यक्रमात रॅम्प वॉक देखील केला.


हेही वाचा : बिपाशा बसूने ठेवलं मुलीचं ‘हे’ गोड निकनेम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -