घरमनोरंजनआलियाने दिला गोंडस मुलीला जन्म; कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण

आलियाने दिला गोंडस मुलीला जन्म; कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मागील अनेक दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत होती. दरम्यान नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार आलियाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. यंदा एप्रिल महिन्यात आलिया आणि रणबीर कपूरचं लग्न झालं. त्यानंतर दोन महिन्यांनी आलिया प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली. अनेकदा आलिया तिच्या बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. दरम्यान, आज सकाळी 7:30 च्या सुमारास आलिया डिलीव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती.

आलियाने दिला गोंडसी मुलीला जन्म
आज सकाळी आलिया पती रणबीरसोबत एच एन रिलांयस हॉस्पिटलमध्ये डिलीव्हरीसाठी पोहोचली होती. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या आनंदाच्या बातमीने संपूर्ण कपूर कुटुंबीय आनंदी झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

मागील काही दिवसांपूर्वी आलियाच्या एका रिपोर्ट्समध्ये आलियाच्या बाळाचा जन्म शाहीन भट्टच्या वाढदिवसाच्या आस-पास होऊ शकतो. परंतु आता ही माहिती चुकीची ठरली आहे.

जून महिन्यात दिली होती गोड बातमी
आलिया आई होणार असल्याची बातमी तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली होती. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या सोबत रणबीर देखील होता. मात्र, त्यानंतर अनेकांनी आलियाला ट्रोल देखील केलं होतं.

- Advertisement -

‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकले आलिया-रणबीर
9 सप्टेंबर रोजी आलिया-रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरातून एकूण 360 कोटींचा टप्पा पार केला आहे. बॉलिवूड 2022 मधील हा सर्वात मोठा सुपरहिट असल्याचं म्हटलं जात आहे.

 


हेही वाचा :

डिलिव्हरीसाठी आलिया रुग्णालयात दाखल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -