Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन आलिया-करीना दिसणार एका चित्रपटात? फोटो शेअर करत केला खुलासा

आलिया-करीना दिसणार एका चित्रपटात? फोटो शेअर करत केला खुलासा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात आलियासोबत अभिनेता रणवीर सिंहदेखील मुख्य भूमिका साकारत आहे. आलिया तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील चर्चेत असते. नुकतेच आलियाने अभिनेत्री करीना कपूरसोबत काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहेत.

आलिया आणि करीनाचे फोटो व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आलिया आणि करीनाचे सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत ज्यात या दोघींही एकमेकींसोबत पोझ देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये आलियाने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला असून करीनाने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. आलियाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये, आलिया भट्ट आरशात पाहत आहे आणि करीना कपूर पोझ देत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ही जोडी वेगवेगळ्या आरशात एकत्र पोझ देताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत या दोघींही सुंदर पोझ देताना दिसत आहेत.

- Advertisement -

या फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये आलियाने लिहिलंय की, “हे आणखी चांगले होऊ शकते का. P.S- कोणीतरी आम्हाला एकत्र चित्रपटात कास्ट करू शकते, म्हणजे आम्ही सेटवर चर्चा करण्यात आपला जास्त वेळ घालवू.” दरम्यान, त्यांच्या या पोस्ट अनेकजण कमेंट्स करत आहेत.

 


- Advertisement -

हेही वाचा :

ऑनलाइन म्युझिक आणि पॉडकास्ट अ‍ॅपवर अरिजीत सिंह ठरला लोकप्रिय गायक

- Advertisment -