69 वा फिल्मफेयर पुरस्कार रविवार, 28 जानेवारी रोजी पार पडला असून गुजरातमधील गांधीनगरमध्ये या रेड कार्पेट नाइटचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. ज्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, यातील आलिया-रणबीरचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे ज्यामध्ये ते दोघेही एकत्र डान्स करताना दिसत आहेत.
आलिया-रणबीरचा जमाल कुडू गाण्यावर डान्स
View this post on Instagram
69 वा फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात रणबीरने अॅनिमल चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. यावेळी तो स्टेजवरुन खाली येतो आणि आलियासोबत डोक्यावर ग्लास घेऊन डान्स करतो. काहीवेळ दोघेही डान्स करतात. त्यानंतर आलियाला किस करुन रणबीर पुन्हा स्टेजवर निघून जातो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आलिया-रणबीरने पटकावला सर्वोत्कृष्ट अॅक्टरचा पुरस्कार
यंदाच्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात आलियाला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. तर रणबीर कपूरने ‘अॅनिमल’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार पटकावला.