श्रद्धा कपूरसोबत चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आलियाने दिलेल्या नकाराला रणबीरचं उत्तर…

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. सध्या हे दोन्ही कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. रणबीर आणि श्रद्धाची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अशातच एका ठिकाणी प्रमोशनसाठी गेलेल्या रणबीर कपूरला पत्नी आलियाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर तो, तुम्ही वाद निर्माण करत आहात. असा म्हणाला.

खरं तर ‘तू झूठी मैं मक्कार’च्या प्रमोशनदरम्यान रणबीर कपूरला विचारण्यात आलं की, आलियाने त्याला श्रद्धा कपूरसोबत चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सांगितले नकार दिला होता का? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणाला, “ती का नकार देईल? तुम्ही अशा अफवा पसरवत आहात. असं आलियाने कधीही सांगितलेले नाही. तुम्ही वाद निर्माण करत आहात. माझ्या आयुष्यात कोणताही वाद नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

त्यानंतर पुढे रणबीर कपूरला विचारण्यात आले की आलियाने तुझा हा चित्रपट पाहिला आहे का, यावर रणबीरने सांगितले की, “आलियाने चित्रपट पाहिला नाही. सध्या ती रणवीर सिंगसोबत काश्मीरमध्ये ‘रॉकी और राणीकी प्रेमकहानी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती लवकरच परत आल्यावर चित्रपट पाहणार आहे. ती माझी चीअरलीडर आहे”.

‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’ 8 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही स्टार्सशिवाय डिंपल कपाडिया आणि स्टँडअप कॉमेडियन अनुभव बस्सी देखील यात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक लव रंजन यांनी केले आहे.

 


हेही वाचा :