अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. अनेकदा सोशल मीडियावर आलियाला विविध कारणांमुळे ट्रोल केलं जातं. अशातच, आता आलियाने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
नुकत्याच काही दिवासांपूर्वी एका वृत्तपत्राच्या सम्मेलनात आलिया उपस्थित होती. यावेळी आलियाला विचारण्यात आलं की, तिला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि इतर गोष्टींमुळे होणाऱ्या ट्रोलिंगचा राग येतो का?
आलियाने ट्रोलर्सला दिलं उत्तर
View this post on Instagram
यावेळी आलियाने सांगितली की, “मला वाटतं की मी एक अशी व्यक्ती बनले आहे जिच्याकडे तक्रार करण्यासारखे काही नाही. मला त्याची पर्वा नाही, पण कधी कधी असं होतं की या सगळ्याचा मला त्रास होतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की त्यांना हे सर्व यश पाहण्याचे सौभाग्य मला मिळाले.”
पुढे आलिया म्हणाली की, “कधी कधी तुम्ही स्वतः बद्दल आणि तुमच्या कुटुंबीयांबद्दल खराब गोष्टी नाही वाचू शकत. परंतु यासाठी तुम्ही प्रेक्षकांसोबत भांडू शकत नाही. जोपर्यंत माझे चित्रपट चांगले चालत आहेत मी त्यांचे मनोरंजन करत राहीन. तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही. आज मी जे काही ते प्रेक्षकांमुळे आहे.”