घरमनोरंजनडिलिव्हरीसाठी आलिया रुग्णालयात दाखल

डिलिव्हरीसाठी आलिया रुग्णालयात दाखल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप चर्चेत आहे. यंदा एप्रिल महिन्यात आलिया आणि रणबीर कपूरचं लग्न झालं. त्यानंतर दोन महिन्यांनी आलिया प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली. त्यानंतर अनेकदा आलिया तिच्या बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. दरम्यान, आता नुकत्याच मिळालेल्या एका बातमीनुसार आलिया डिलीव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मीडिया रिपोर्ट्सच्या मते, आलिया पती रणबीरसोबत एच एन रिलांयस हॉस्पिटलमध्ये डिलीव्हरीसाठी पोहोचली आहे. आता कोणत्याही क्षणी आलियाच्या बाळाचा जन्म होऊ शकतो. ही बातमी कळताच आलिया-रणबीरचे चाहते खूप खूश झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी आलियाच्या एका रिपोर्ट्समध्ये आलियाच्या बाळाचा जन्म शाहीन भट्टच्या वाढदिवसाच्या आस-पास होऊ शकतो. परंतु आता ही माहिती चुकीची ठरु शकते.

- Advertisement -

जून महिन्यात दिली होती गोड बातमी

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

आलिया आई होणार असल्याची बातमी तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली होती. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या सोबत रणबीर देखील होता. मात्र, त्यानंतर अनेकांनी आलियाला ट्रोल देखील केलं होतं.

- Advertisement -

‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकले आलिया-रणबीर

9 सप्टेंबर रोजी आलिया-रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरातून एकूण 360 कोटींचा टप्पा पार केला आहे. बॉलिवूड 2022 मधील हा सर्वात मोठा सुपरहिट असल्याचं म्हटलं जात आहे.

 


हेही वाचा :

कतरिनाच्या ‘फोन भूत’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी कमावले केवळ इतके कोटी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -