घरमनोरंजनवयाच्या 11 व्या वर्षापासून रणबीरच्या प्रेमात होती आलिया

वयाच्या 11 व्या वर्षापासून रणबीरच्या प्रेमात होती आलिया

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाला आज 1 वर्ष पूर्ण झालं. 14 एप्रिल 2022 रोजी हे दोघं विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या काही महिन्यानंतर म्हणजेच 6 नोव्हेंबर 2022 रोजी आलिया-रणबीरच्या मुलीचा जन्म झाला. आलिया-रणबीरच्या प्रेमाची खरी सुरवात ब्रह्मास्त्र चित्रपटापासून झाली होती. मात्र, तुम्हाला ठाऊक आहे का की, आलिया भट्ट लहानपणापासूनच रणबीर कपूरवर प्रेम करत होती. खरंतर दोघेही लहानपणी ‘ब्लॅक’ चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदाच भेटले होते. रणबीर कपूर चित्रपटाच्या सेटवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याचवेळी आलिया भट्ट या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by M (@ranlia_shipper)

आलिया भट्ट 11 वर्षांची असताना संजय लीला भन्साळीच्या ‘ब्लॅक’साठी ऑडिशनसाठी आली होती. त्यावेळी रणबीर कपूरला पाहून आलिया त्याच्या प्रेमात पडली होती. ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या चित्रपटाच्या एका पत्रकार परिषदेमध्ये आलियाने रणबीर कपूर तिचा लहानपणीचा क्रश आहे आणि तो नेहमीच असेल अस ती म्हणाली होती. एवढेच नाही तर आलियाने जेव्हा रणबीर कपूरसोबत लग्न करण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘मी प्रामाणिकपणे सांगेन मी आधीच माझ्या मनात त्याच्याशी लग्न केलं आहे जेव्हा मी रणबीरला पहिल्यांदा पडद्यावर पाहिलं तेव्हा मी अगदी लहान असतानाच त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं होतं. मी आजही तेच मानते.”

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे एकत्र आले आलिया-रणबीर

- Advertisement -

2014 मध्ये आलिया भट्ट करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये दिसली होती. यावेळी तिने रणबीर कपूरबद्दलच्या भावना सांगितल्या. ‘मला ते खूप आवडतो’ असंही ती म्हणाली होती. त्यानंतर 2018 मध्ये त्यांना ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघे खूप जवळ आले. त्यानंतर दोघांनीही आपलं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

 

- Advertisement -

हेही वाचा :

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला पोहोचल्या काठ्या घेऊन; पुढे काय झालं…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -