आलिया लग्नाआधीच होती गरोदर? बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रींनी सुद्धा लग्नाआधी दिली होती गूड न्यूज

आलिया आणि रणबीरच्या लग्नाला नुकतेच दोन महिने झाले आहेत, लग्नानंतर लगेच दोन महिन्यांमध्ये आलिया प्रेग्नेंट असल्याची बातमी कळताच अनेकजण आलिया लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याचं म्हटलं जात आहे

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत. लग्न झाल्यापासून दोघेही बऱ्याच प्रमाणात चर्चेत असतात. आता अशातच पुन्हा मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण येत आहे. त्याचं कारण म्हणजे नुकताच आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती आई होणार असल्याची बातमी सांगितली आहे. आलियाची ही पोस्ट पाहताच अनेक दिग्गज कलाकारांसह आलियाच्या चाहत्यांनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आलिया भट्टने शेअर केली पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

आलिया भट्टने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक छान फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर हॉस्पिटलमध्ये दिसत आहेत. दोघेही डिस्पले कडे पाहत आहेत. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या जन्माला येणाऱ्या मुलाची झलक दिसत आहे. डिस्पलेकडे पाहून आलिया खूप खूश असल्याचं दिसत आहे.या फोटोसोबत आलियाने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आमचे मुल लवकरच येत आहे.” आलियाची ही पोस्ट पाहताच अनेक दिग्गज कलाकारांसह आलियाच्या चाहत्यांनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान आलिया आणि रणबीरच्या लग्नाला नुकतेच दोन महिने झाले आहेत, लग्नानंतर लगेच दोन महिन्यांमध्ये आलिया प्रेग्नेंट असल्याची बातमी कळताच अनेकजण आलिया लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच आत्तापर्यंत बॉलिवूडमधील या अभिनेत्री लग्नाआधीच गरोदर राहिल्या होत्या.

या अभिनेत्री लग्नाआधीच राहिल्या होत्या गरोदर

 • श्री देवी
  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्री देवी सुद्धा लग्नाआधीच गरोदर होती. श्री देवी तिच्या लग्नामध्ये सात महिन्यांची गरोदर होती.
 • दीया मिर्जा
  अभिनेत्री दीया मिर्जा सुद्धा तिच्या लग्नाआधीच गरोदर राहिली होती. दीया मिर्जाने लग्नाच्या चार महिन्यानंतर आपल्या मुलाला जन्म दिला.
 • महिमा चौधरी
  २००६ मध्ये माहिमा चौधरीने बॉबी मुखर्जीसोबत लग्न केल होतं. मात्र गर्भवती राहिल्यानंतर लगेच महिमाने लग्न केलं.
 • नेहा धूपिया
  नेहा धूपियाने २०१८ मध्ये अंगद बेदी सोबत लग्न केले होते. त्यानंतर तिने ती गरोदर असल्याची घोषणा केली होती.
 • नताशा स्टेंकोविक
  भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्याची पत्नी नताशा सुद्धा लग्नाआधीच गरोदर होती. ही बातमी समोर येताच दोघांनीही लग्न केलं.