घर मनोरंजन 'गंगूबाई काठियावाड़ी' साठी आलियाने पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

‘गंगूबाई काठियावाड़ी’ साठी आलियाने पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

Subscribe

चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला असून 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अनेक कलकारांना पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आलिया व्यतिरिक्त अभिनेत्री कृती सेननला देखील मिमीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, आताराष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर आलियाने आनंद व्यक्त करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आलियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलियाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातलेली दिसत आहे. या फोटोमध्ये आलिया हात जोडून पोझ दिली आहे. या फोटोच्या खालील कॅप्शनमध्ये आलियाने लिहिलंय की, “संजय सरांसाठी… संपूर्ण क्रू, संपूर्ण कुटुंबासाठी, संपूर्ण टीमसाठी आणि शेवटी माझ्या प्रेक्षकांसाठी… हा राष्ट्रीय पुरस्कार तुमचा आहे. कारण तुमच्याशिवाय यापैकी काहीही शक्य नाही. ”

आलियाने केलं कृती सेननचं कौतुक

- Advertisement -

याच पोस्टमध्ये आलियाने अभिनेत्री कृती सेननचं देखील कौतुक केलं आहे. ज्यामध्ये तिने लिहिलंय की, “कृती, मीमी चित्रपट पाहिल्यानंतर मी तुला मेसेज केला तो दिवस मला आठवतो. हा इतका प्रामाणिक आणि दमदार परफॉर्मन्स होता. मी खूप रडले होते… तुझ्यातील ताऱ्याला चमकव… जग तुझे शिंपले आहे. आलिया भट्टच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.


हेही वाचा : 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023: ‘एकदा काय झालं’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, पाहा विजेत्यांची यादी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -