बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर बॉलिवूडमधील पॉवर कलप म्हणून ओळखले जातात. या दोघांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. 2022 मध्ये या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं त्यानंतर काही महिन्यातच त्यांना एक मुलगी झाली. दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत आलियाने रणबीरच्या आवडी-निवडींबाबत खुलासा केला आहे. ज्यामुळे अनेकजण रणबीरला ट्रोल करु लागले आहेत.
रणबीरच्या सवयींचा आलियाने केला खुलासा
View this post on Instagram
नुकत्याच एका मुलाखतीत आलियाने रणबीरच्या आवडी-निवडींबाबत खुलासा केला होता. ज्यामध्ये तिने सांगितलं की, “रणबीरला घरामध्ये जास्त मोठ्याने आवाज केलेला आवडत नाही.” ज्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोल केलं होतं. दरम्यान, अशातच आलियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल ज्यात आलिया लिपस्टिक कशी लावायची हे सांगत आहे. व्हिडिओमध्ये, तिने सांगितले की, ती बहुतेक न्यूज शेडची लिपस्टिक लावते. त्यानंतर तिने लिपस्टिक लावली आणि लगेच पुसून टाकली.
आलिया भट्ट पुढे म्हणाली की, “मी आधी लिपस्टिक लावते आणि नंतर पुसते, कारण तिचा पती, जो तिचा बॉयफ्रेंड देखील आहे, त्याला हे अजिबात आवडत नाही. कारण त्याला माझे नैसर्गिक ओठ जास्त आवडतात.” असं आलिया म्हणाली.
नेटकऱ्यांनी केलं रणबीरला ट्रोल
आलिया भट्टचा हा व्हिडीओ समोर येताच अनेकांनी रणबीरला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने कमेंट केली की, “जितके मी रणबीर कपूरबद्दल ऐकतो, तितकीच मला आलियाबद्दल भीती वाटते. जर तुमचा नवरा किंवा प्रियकर तुम्हाला तुमची लिपस्टिक पुसण्यास सांगत असेल, तर तुम्हाला त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याची गरज आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय की, यात गोंडस किंवा मजेदार असे काहीही नाही. देशातील सर्वात मोठ्या अभिनेत्रीला यातून जावं लागत असेल यावर माझा विश्वास बसत नाही.”
हेही वाचा :