बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या काही कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी मुलीमुळे तर कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे आलिया चर्चेत असते. अशातच, आलियाने सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती स्विमिंग करताना दिसत आहे. चाहते तिच्या या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.
आलियाने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो
View this post on Instagram
आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. आलियाच्या या व्हिडिओमध्ये ती लाल रंगाची मोनोकिनी परिधान करून स्विमिंग करताना दिसताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत आलियाने लिहिलंय की, ‘माझ्या दिवसाच्या सुट्टीचे वेळापत्रक… एवढेच. हे माझे वेळापत्रक आहे. आलिया भट्टच्या या व्हिडिओला चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आलियाचे आगामी चित्रपट
काही महिन्यांपूर्वी आलिया भट्ट रणवीर सिंहसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. आलियाने यावर्षी ऑगस्टमध्ये ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आलिया भट्ट आता दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.