घरमनोरंजनजगभरातील प्रेक्षकांना अलका याज्ञिक यांच्या गाण्याची भुरळ; टेलर स्विफ्ट, ड्रेक यांनाही टाकलं...

जगभरातील प्रेक्षकांना अलका याज्ञिक यांच्या गाण्याची भुरळ; टेलर स्विफ्ट, ड्रेक यांनाही टाकलं मागे

Subscribe

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांच्या मधुर आवाजाचे लाखो चाहते आहेत. अलका याज्ञिक त्यांच्या गाण्याने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकतात.बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील अनेक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत.  आजही प्रेक्षक त्यांची गाणी आवर्जून ऐकतात. दरम्यान, अशातच अलका याज्ञिक यांनी एक नवा विक्रम केला आहे.

अलका याग्निक यांनी प्रसिद्ध गायक टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यांसारख्या गायकांना मागे टाकत सलग तिसऱ्या वर्षी 2022 मध्ये सर्वात जास्त ऐकलेल्या गाण्यांमध्ये अलका याग्निक यांची गाणी अग्रस्ठामी आहेत. त्यामुळे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. अलका त्यांच्यानंतर बॅड बन्नी 14.7 अब्ज स्ट्रीम्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

अलका याज्ञिक अग्रस्थानी

 

View this post on Instagram

 

A post shared by Alka Yagnik (@therealalkayagnik)

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, अलका याज्ञिक यांच्या गाण्यांना 15.3 अब्ज स्ट्रीम रेकॉर्ड करण्यात आले आहे. त्यांच्यानंतर बॅड बन्नी 14.7 अब्ज स्ट्रीम्ससह दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे तर उदित नारायण यांनी 10.8 बिलियन अरिजीत सिंहने 10.7 बिलियन आणि कुमार सानूने 9.09 बिलियन मिळवले आहेत.

- Advertisement -

90 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका
अलका याज्ञिक यांनी 90 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. ‘अगर तुम चाहो’, ‘परदेसी परदेसी’, ‘गजब का है दिन’, ‘ताल से ताल मिला’, ‘चुरा के दिल मेरा’, ‘गजब का है दिन’, ‘सूरज हुआ मद्धम’, ‘अगर तुम साथ हो’ आणि ‘एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे’ यांसारखी लोकप्रिय गाणी गायली आहेत.

 


हेही वाचा :

म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला, कन्नड गाणं न गायल्याने संतप्त प्रेक्षकाने फेकली बाटली

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -