घरमनोरंजनअजय देवगण आणि करण जोहरमध्ये ऑल इज वेल?

अजय देवगण आणि करण जोहरमध्ये ऑल इज वेल?

Subscribe

काजोल आणि अजय दोघेही करण जोहरबरोबर पोझ देताना फोटो काजोलने शेअर केला आहे. कॉफी विथ करणमध्ये दोघेही आले होते.

अजय देवगण आणि काजोलने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण – ६’ साठी नुकतंच चित्रीकरण पूर्ण केलं आहे. काजोलने ‘ऑल इज वेल’ अशी कॅप्शन देत आपल्या इन्स्टावरून या दोघांसह फोटो शेअर केले आहेत. काजोल आणि अजय दोघेही करण जोहरबरोबर पोझ देताना हा फोटो आहे. मात्र आतापर्यंत करण आणि अजय या दोघांमध्ये कधीही अजिबात चांगलं नव्हतं अशाच बातम्या समोर येत होत्या. वास्तविक बऱ्याच वर्षानंतर या तिघांना एकत्र पाहण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

All is well…….. ?

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

- Advertisement -

करण आणि अजयमध्ये मैत्री नव्हती

या चित्रीकरणाचा एक बुमरँग व्हिडिओ इन्स्टाग्रामवर काजोलने पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये करण, काजोल आणि अजय आपल्या स्टायलिश अंदाजामध्ये पोझ देताना दिसत आहेत. शिवाय ‘ऑल इज वेल’ असं कॅप्शन देत आता सर्व काही दोघांमध्येही पूर्ववत असल्याचं काजोलनं सांगितलं आहे. या कॅप्शनवरूनच काजोलला नक्की काय म्हणायचं आहे ते समोर येत आहे. करण आणि अजयमध्ये कधीही मैत्री नव्हती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे २०१६ मध्ये करणचा ‘ए दिल है मुश्किल’ आणि अजय देवगणचा ‘शिवाय’ एकत्रच प्रदर्शित झाला होता. त्याचवेळी रशीद खानने आरोप लावला होता की, शिवाय या चित्रपटाबद्दल वाईट बोलण्यासाठी करणने त्याला २५ लाख रूपये दिले होते. त्यानंतर तर काजोल आणि करणच्या मैत्रीमध्येही दुरावा आला होता. मात्र आता हा फोटो पाहिल्यानंतर पुन्हा एकदा सर्व काही नीट असल्याचं समोर आलं आहे. सर्व काही विसरून पुन्हा एकदा काजोल आणि करणने आपली मैत्री पक्की केल्याचं दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -