घर मनोरंजन 'ड्रीम गर्ल 2'ची टीम मल्टी सिटी प्रमोशनल टूरसाठी सज्ज

‘ड्रीम गर्ल 2’ची टीम मल्टी सिटी प्रमोशनल टूरसाठी सज्ज

Subscribe

ह्या वर्षातील रोमँटिक कॉमेडी – ड्रीम गर्ल 2 25 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर आणि अप्रतिम गाण्यांच्या असंख्य पोस्ट्स आणि प्रतिक्रियांसोबतच प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रतिभावान अभिनेता आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हे दोन्ही कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इंदौर, चंदीगड, जयपूर, अहमदाबाद आणि पुणे यांसारख्या देशभरातील अनेक शहरांमध्ये प्रवास करणार आहेत.

आयुष्मान वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रवास करणार असून त्याच्यासोबत चित्रपटातील कलाकार सहभागी होणार आहेत. आयुष्यमानसोबत इंदौरमध्ये अनन्या पांडे, चंदिगडमध्ये मनजोत सिंग तसेच, जयपूरमध्ये एकता कपूर, अहमदाबादमध्ये परेश रावल आणि पुण्यात अभिषेक बॅनर्जी असून आयुष्यमान या कलाकारांसोबत आपल्या ड्रीम गर्ल 2 चे जोरदार प्रमोशन करताना दिसणार आहे.

- Advertisement -

ही संपूर्ण यादी पाहिल्यानंतर, हे समजू शकेल की ड्रीम गर्लच्या रंगीबेरंगी मल्टी-सिटी टूरची उत्सुकता बहरात आहे. या मल्टी सिटी प्रमोशनल टूर दरम्यान चित्रपटातील सर्व कलाकार त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधणार आहेत. आयुष्मान त्याच्या सदाबहार उपस्थितीने या वातावरणात जल्लोष पसरवण्यासाठी सज्ज झाला असून प्रेक्षक या मल्टी-सिटी टूरमध्ये संपूर्ण टीमच्या उत्साहाचे साक्षीदार होणार आहेत.

ड्रीम गर्ल 2, राज शांडिल्य दिग्दर्शित आणि एकता आर कपूर आणि शोभा कपूर निर्मित, आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात परेश रावल, राजपाल यादव, विजय राज, मनजोत सिंग अभिषेक बॅनर्जी, मनोज जोशी आणि अन्नू कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : मी तारा सिंगचा फॅनबॉय… कार्तिक आर्यनने ‘गदर 2’चं केलं कौतुक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -