अल्लू अर्जुन-रश्मिका स्टारर फिल्म ‘Pushpa The Rise’ च्या रिलीजची तारीख जाहीर

अल्लू अर्जुन-रश्मिका स्टारर फिल्म 'Pushpa The Rise’ च्या रिलीजची तारीख जाहीर

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा आगामी चित्रपट पुष्पामधील भूमिकांमुळे चांगला चर्चेत आहे. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तेलगू भाषेत असणारा हा चित्रपट तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना याचा चित्रपट पुष्पा द राइज या वर्षी १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या तारखेच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. असे सांगितले जात आहे की, हा चित्रपट दोन भागात तयार करण्यात आला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका पहिल्यांदा एकमेकांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग डिसेंबरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर दुसरा भाग पुढच्या वर्षी २०२० मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

मायथरी चित्रपटाचे निर्माते के. नवीन येरनेनी आणि वाय रविशंकर यांनी असे सांगितले की, “प्रेक्षकांना मनोरंजन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला आशा आहे की प्रेक्षकांना पुष्पा द राइज मधील अॅक्शन, रोमान्स आणि भावना नक्कीच आवडतील. हा एक अनोखा चित्रपट असून त्यांनी असा दावा केला की भारतीय चित्रपटात अशी कथा शोधली गेली नाही. अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसोबत रिलीज डेट शेअर करण्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत.’ अल्लू अर्जुन, रश्मिका मंदना आणि फहाद फैसिल अभिनीत हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट मुत्तमशेट्टी मीडिया आणि मायथरी मूव्ही मेकर्सच्या बॅनरखाली तयार झाला आहे.