Resul Pookutty welcomed on-board Allu Arjun, Rashmika Mandanna, Fahadh Faasil starrer Pushpa" /> Resul Pookutty welcomed on-board Allu Arjun, Rashmika Mandanna, Fahadh Faasil starrer Pushpa" />
Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अल्लू अर्जून आणि रश्मिकाच्या 'पुष्पा' चा टिझर प्रदर्शित

अल्लू अर्जून आणि रश्मिकाच्या ‘पुष्पा’ चा टिझर प्रदर्शित

'पुष्पा' हा चित्रपट आध्र प्रदेशाच्या डोंगरामध्ये सुरु असलेल्या लाल चंदनाची तस्करी आणि खऱ्य घटनेवर आधारित आहे.

Related Story

- Advertisement -

दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनने आपल्या जबरदस्त अॅक्शनच्या जोरावर रसिकप्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे अल्लू अर्जूनचे चाहतावर्ग फक्त दक्षिण भारतातच नाहीतर संपूर्ण जगात आाहे. प्रत्येक चित्रपटातून तो त्याचा दमदार अभिनय प्रेक्षकांसमोर घेवून येत असतो. अल्लू अर्जूने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसादिवशी त्याने एक सरप्राइज त्याच्या चाहत्यांना दिले आहे. ‘पुष्पा’या त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर त्याच्या वाढदिवसादिवशी प्रदर्शित करण्यात आला आहे. पुष्पाच्या या टिझरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा टिझर सध्या सोशल मीडियावर प्रचंड धूमाकूळ घालत आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट आध्र प्रदेशाच्या डोंगरामध्ये सुरु असलेल्या लाल चंदनाची तस्करी आणि खऱ्य घटनेवर आधारित आहे. हा बहुभाषित चित्रपट १३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टिझर पाहता अल्लू अर्जून या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचा एक वेगळ अंदाज चित्रपटात पाहायला मिळणार असून आजपर्यंत त्याच्या चाहत्यांनी त्याला या अंदाजात कधी बघितलं नसेल.

- Advertisement -

टिझर प्रदर्शित होताच अल्लू अर्जूनच्या चाहत्यांचा त्याला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा टिझर २९ कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या टिझरमधील अल्लूचा लूक पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जूनसोबत अभिनेत्री रश्मिका मंडनादेखील दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाद्वारे अल्लू अर्जून आणि रश्मिका मंडाना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पदार्पण करताना दिसणार आहे.


हे वाचा-  ”या बाईनं माझं आयुष्य बदललं”- अपूर्वा नेमळेकर

- Advertisement -