Instgram वर 15 मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला साउथ सुपरस्टार बनला Allu Arjun

पुष्पा सिनेमाने अल्लू अर्जुनच्या फॅन फॉलोविंग एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आणि इतकी मोठी फॅन फॉलोविंग असलेला अल्लू अर्जुन हा पहिला साउथ सुपरस्टार ठरला आहे.

Allu Arjun became the first South superstar with 15 million followers on Instagram
Instgram वर 15 मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला साउथ सुपरस्टार बनला Allu Arjun

साउथ फिल्म सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun)  सध्या त्याच्या पुष्पा (Pushpa)  या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे.पुष्पा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. अल्लू अर्जुनच्या सिनेमाने लाखो चाहते त्याच्या प्रेमात पडले आहेत. सिनेमातील त्याचे दमदार डायलॉग, जबरदस्त अभिनय आणि भन्नाट डान्सवर प्रेक्षक अक्षर: फिदा झाले आहेत. पुष्पा सिनेमातील अल्लू अर्जुन म्हणजे एक्शन, ड्रामा, डान्स आणि कॉमेडीचा फुल फ्लेज पॅकेज आहे. अल्लू अर्जुन सोशल मीडियावर देखील प्रचंड लोकप्रिय आहे. नुकताच अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर 15 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. पुष्पा सिनेमाने अल्लू अर्जुनच्या फॅन फॉलोविंग एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आणि इतकी मोठी फॅन फॉलोविंग असलेला अल्लू अर्जुन हा पहिला साउथ सुपरस्टार ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अल्लू अर्जुन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सोशल मीडियावर त्याची वेगळी फॅन फॉलोविंग आहे. केवळ त्याचे चाहतेच नाही अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारही अल्लू अर्जुनला सोशल मीडियावर फॉलो करतात. शुक्रवारी अल्लू अर्जुनने 15 मिलियनचा टप्पा गाठला आणि लोकप्रियतेचा एक मानचा किताब आपल्या नावे केला. 15मिलियन्सचा टप्पा गाठल्यानंतर अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर त्याच्या सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. ’15 मिलियन फॉलोवर्स! तुमच्या या प्रेमासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन’, असे म्हणत अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अल्लू अर्जुनच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर सध्या त्याच्या पुष्पा या सिनेमाचीच सर्वत्र चर्चा आहे. मुळ तेलुगू भाषेत असलेला हा सिनेमा मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषेत देखील प्रसिद्द करण्यात आला आहे. प्रेक्षकांनीही सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सिनेमा अमेझॉन प्राइमवर देखील रिलीज झाला आहे.


हेही वाचा – ‘Pushpa’ सिनेमाचे हिंदी व्हर्जन पाहिलात का? इथे झालाय रिलीज