HomeमनोरंजनAllu Arjun : अकारण त्याला अडकवलं जातंय... अल्लू अर्जुनच्या सपोर्टमध्ये बोनी...

Allu Arjun : अकारण त्याला अडकवलं जातंय… अल्लू अर्जुनच्या सपोर्टमध्ये बोनी कपूर

Subscribe

4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 च्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादमधील संध्या थिएटरच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा मुलगा रुग्णालयात दाखल आहे. या प्रकरणामुळे अल्लू अर्जुनला एक रात्र कारागृहात पाठवण्यात आले आणि नंतर अंतरिम जामिनावर त्याला सोडण्यात आले. त्यानंतर या प्रकरणावर बरीच राजकीय भाकरीही भाजली गेली.

सिनेविश्वातील तमाम दिग्गज सेलिब्रिटी अल्लू अर्जुनच्या समर्थनार्थ पुढे आले. आता हिंदी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यानेही अल्लू अर्जुनच्या वक्तव्य केले असून या प्रकरणात अल्लू अर्जुनचे नाव विनाकारण ओढले जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

- Advertisement -

अल्लू अर्जुनला मिळाली या निर्मात्याची साथ :

हैदराबाद येथील ‘संध्या थिएटर चेंगराचेंगरी’ प्रकरणावरून आतापर्यंत बरेच वाद झाले आहेत. या प्रकरणावर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज निर्माते बोनी कपूर हेदेखील यावर मोकळेपणाने व्यक्त झाले आहेत. अलीकडेच बोनी यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले-

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिकिटांचे दर लक्षणीय वाढले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अल्लू अर्जुनला या प्रकरणात विनाकारण ओढण्यात आले आणि एका चाहत्याच्या मृत्यूसाठी त्याला जबाबदार धरण्यात आले. चित्रपट पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीमुळेच हा प्रकार घडला.

- Advertisement -

याशिवाय, बोनी कपूर यांनी असेही सांगितले की ते वर्षानुवर्षे हे निरीक्षण करत आहेत की साऊथ सुपरस्टार अजित कुमार, रंजनीकांत आणि महेश बाबू यांसारख्या अनेक अभिनेत्यांचे चित्रपट पाहण्यासाठी हजारो लोक थिएटरबाहेर उपस्थित असतात. अजितच्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी 24-30 हजार लोक थिएटर्सबाहेर पाहून त्यांना स्वत:लाही खूप आश्चर्य वाटले होते.

या प्रकरणी उद्या होणार सुनावणी :

याप्रकरणी अल्लू अर्जुनच्या अंतरिम जामिनावर उद्या म्हणजेच ३ जानेवारी रोजी नामपल्ली न्यायालयात सुनावणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेता पवन कल्याण यांनी या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. अल्लूच्या जामीन याचिकेवर न्यायालयाने आपला निर्णय आधीच राखून ठेवला आहे. अशा स्थितीत शुक्रवारी अंतिम आदेश येणार आहे. असं जरी असलं तरी, पुष्पा 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर कोणताही परिणाम झालेला नाही.

हेही वाचा : Rohan Mapuskar : रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण!


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -