अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमा थिएटरमध्ये येऊन काहीच दिवस झाले आहेत. अल्लू सध्या प्रीमियरमध्ये झालेल्या हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या अपघाताशी संबधित बातम्यांशी चर्चेत आहे. येथे झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलाचा मृत्यु झाला होता आणि तिचा 8 वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. दरम्यान, आता तो मुलगा रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनवरचे संकट काही संपायचे नाव घेत नाही आहे.
हैदराबादच्या पोलिस आयुक्तांनी रुग्णालयात जाऊन जखमी झालेला मुलगा श्री तेजच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. या भेटीनंतर मुलाच्या तब्येतीविषयी एक गंभीर बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सर्वाना धक्का बसला असुन अल्लू अर्जुनवरील संकट आणखीनच गहिरे झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मेंदू पूर्णपणे डॅमेज झाला आहे. त्याला यासर्वातून बाहेर येण्यास वेळ लागेल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
View this post on Instagram
दरम्यान अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडियावर यासंबधित एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, मी श्री तेज याच्या तब्येतीबद्दल खूप काळजीत आहे. या घटनेनंतर कायदेशीर प्रक्रियेमुळे मला त्याची भेट टाळण्याचा सल्ला दिला आहे. मी त्याच्यासोबत असून त्याचे उपचार आणि मदत करण्यास बांधील असल्याचं अल्लू अर्जुनने या पोस्टमध्ये म्हटले आहे. श्री तेज लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे, असे तो म्हणाला आहे.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde