तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनचा अपघात

रामपचोदवरम येथे सिनेमाचे शूटींग सुरु आहे.

allu arjun luxurious vanity van falcon met with an accident
तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनचा अपघात

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनला अपघात झाला आहे. शनिवारी अल्लू अर्जुन आगामी ‘पुष्पा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो हैदराबादमध्ये पोहचला होता. परंतु अल्लू अर्जुन यावेळी व्हॅनिटीमध्ये नव्हता. मात्र या व्हॅनमध्ये अल्लू अर्जुनची मेकअप टीम होती. ही मेकअप टीम रामपचोदवरम येथून परतत असताना हा अपघात झाला. व्हॅनिटी व्हॅनच्या ड्रायव्हरने ब्रेक मारताच मागून येणा-या लॉरीने व्हॅनला जोरदार धडक दिली. मात्र या टीममधील सर्वजण सुखरुप आहेत. मात्र या महागड्या व्हॅनिटी व्हॅनचे नुकसान झाले आहे. दुर्घटनेवेळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक जणांनी त्याच्या व्हॅनिटीसोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. या घटनेबाबत पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

सध्या अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. रामपचोदवरम येथे सिनेमाचे शूटींग सुरु आहे. हे शूटींग संपवून टीम हैदराबादला जात होती. मात्र या अपघाताची माहिती मिळताच त्याला धक्का बसला. आणि घरी परतल्यावर त्याने सर्वप्रथम मुलांना कडाडून मिठी मारली. अल्लूची पत्नी स्नेहा हिने या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तो घरी परतलाय, या कॅप्शनसह तिने हा फोटो शेअर केला. शिवाय अल्लू अर्जुन सुरक्षित असल्याची माहितीही दिली. 2019 साली अल्लू अर्जुनने ही व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली होती. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर त्याचे फोटोही शेअर केले होते. त्याने 7 कोटी रुपयांत ही व्हॅनिटी खरेदी केली होती. फाल्कन असे त्याच्या व्हॅनिटीचे नाव आहे.