अल्लू अर्जुनने नाकारली 10 कोटींची ऑफर

सुपरस्टार अल्लू अर्जुनला एका Whisky Brand कंपनीने ब्रँड एन्डॉर्समेंटसाठी 10 कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र, अल्लू अर्जुनने ही ऑफर नाकारली होती.

टॉलिवूडचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या पुष्पा २ चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच या चित्रपटाचं शूटिंग चालू होणार आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनबाबत आणखी एक विषय चर्चेत आला आहे. खरंतर अल्लू अर्जुन त्याच्या वैकुंठपुरमलो आणि पुष्पा चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर अल्लू अर्जुनला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. इतकंच नाही तर त्याला अनेक चित्रपट आणि मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिरातींसाठी ऑफर देखील येत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनला एका पान मसाल्याच्या ब्रँडकडून जाहिरातीसाठी ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी त्याने ती कोट्यावधींची ऑफर नाकारली होती. दरम्यान, अल्लू अर्जुनला पुन्हा अशीच एक कोट्यावधींची ऑफर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

सूत्रांच्या माहितीनुसार, सुपरस्टार अल्लू अर्जुनला एका Whisky Brand कंपनीने ब्रँड एन्डॉर्समेंटसाठी 10 कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र, अल्लू अर्जुनने ही ऑफर नाकारली होती. याचं कारण म्हणजे अल्लू आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या जाहिराती करत नाही. आता समोर आलेल्या माहितीनुसार, सुपरस्टार अल्लू अर्जुन ब्रँड एन्डॉर्समेंटसाठी एकूण 7.5 कोटी वसूल करतो.

या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे अल्लू अर्जुन
सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी पुष्पा २ चित्रपटची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना सुद्धा दिसून येणार आहे. शिवाय या चित्रपटामध्ये अभिनेता विजय सेतुपतिदेखील दिसणार आहे.


हेही वाचा :‘लाल सिंह चड्ढा’च्या बहिष्काराच्या मागणीनंतर आता करीनाने दिली प्रतिक्रिया