Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन अल्लू अर्जुनने पटकावला 'इंडियन ऑफ द ईयर' पुरस्कार

अल्लू अर्जुनने पटकावला ‘इंडियन ऑफ द ईयर’ पुरस्कार

Subscribe

दिल्लीमध्ये नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिथे अल्लू अर्जुनला मनोरंजन क्षेत्रासाठी 'इंडियन ऑफ द ईयर' पुरस्कार देऊन सन्मानित करण्याात आलं.

टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुन मागील अनेक दिवसांपासून त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक महिने उलटून गेले मात्र, अजूनही यातील गाणी आणि टायलॉग लोकांच्या लक्षात आहे. या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला फक्त ओळखच नाही तर अनेक पुरस्कार देखील मिळवून दिले आहेत. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनला न्यूयॉर्कमध्ये एन्युअल इंडियन डे परेडमध्ये ग्रँड मार्शलच्या रुपात देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. तर आता त्याला ‘इंडियन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. या कार्यक्रमा दरम्यानचे अल्लू अर्जुनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अल्लू अर्जुनने पटकावला यंदाचा ‘इंडियन ऑफ द ईयर’ पुरस्कार
दिल्लीमध्ये नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिथे अल्लू अर्जुनला मनोरंजन क्षेत्रासाठी ‘इंडियन ऑफ द ईयर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्याात आलं. हा पुरस्कार पटकावल्या नंतर अल्लू अर्जुन म्हणाला की, मी चित्रपटसृष्टीमध्ये 20 वर्षांपासून काम करत आहे. मला टॉलिवूडमध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हे पहिल्यांदा होत आहे जेव्हा मला दिल्लीतून कोणतातरी पुरस्कार मिळत आहे. त्यामुळे हा माझ्यासाठी खूप खास आहे.”

- Advertisement -

भारत कधीच झुकणार नाही…
अल्लू अर्जुनने पुढे ‘पुष्पा’ चित्रपटातील सुपरहिट डायलॉग ‘पुष्पा….पुष्पराज, मैं झुकेगा नही साला’ ऐवजी पुष्पा स्टाईलमध्ये ‘इंडियन सिनेमा… इंडिया कभी झुकेगा नही’ असं म्हटलं. अल्लू अर्जुनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘पुष्पा 2’ लवकरच होणार प्रदर्शित
‘पुष्पा’ चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपचाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील करोडोंची कमाई केली होती. दरम्यान, आता प्रेक्षक ‘पुष्पा 2’ ची वाट पाहत आहेत. 2023 मध्ये ‘पुष्पा 2’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा :

ऋतिकने पहिल्यांदाच शेअर केला सबासोबतचा फोटो; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -