Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ‘पुष्पा 2 ’मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘पुष्पा 2 ’मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

दरम्यान पुष्पा चित्रपटाचा पहिला पार्ट प्रदर्शित झल्यानंतर पुष्पा 2 ची सुद्धा चर्चा सुरु होती अशातच पुष्पा २ च्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे.

दक्षिणेकडील सुपरस्टार अल्लू याच्या पुष्पा या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले होते. प्रेक्षकांनी हा चित्रपट अनेकवेळा पहिला. या चित्रपटातील अल्लू अर्जुनाची स्टाईल, चित्रपटातली डायलॉगने चाहत्यांना भुरळ घातली आहे. पुष्पा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस लोटले पण तरीही प्रेक्षकांमधली या चित्रपटाची क्रेझ काही कमी झाली नाही. सोशल मीडियावर सजूनही या चित्रपटाचे रिल्स अजूनही दिसत आहेत.

दरम्यान पुष्पा चित्रपटाचा पहिला पार्ट प्रदर्शित झल्यानंतर पुष्पा 2 ची सुद्धा चर्चा सुरु होती अशातच पुष्पा २ च्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चित्रपटाचे छायाचित्रकार कुबा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अल्लू अर्जुन बरोबरचा शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी “उत्कंठावर्धक प्रवास सुरू…थॅंक यू आयकॉन स्टार”, असं कॅप्शन दिलं आहे. ‘पुष्पा 2’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kuba (@kubabrozek)

- Advertisement -

17 डिसेंबर 2021 ‘पुष्पा : द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर गाल आजमावला. या चित्रपटात अल्लू अर्जुनसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होती. दरंयान पुष्पा या चित्रपटामुळे रश्मिकालाही या चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली.

- Advertisement -

पुष्पा 2: द रुल’ या सिक्वेलसाठी प्रेक्षक सुद्धा मोठया प्रमाणावर उत्सुक आहेत. दरम्यान पुष्पा 2 मध्ये जास्त ऍक्शन आणि नई अल्लू अर्जुनाचा डॅशिंग लूक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होतो आहे यासाठी चाहते सुद्धा उत्सुक आहेत.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -