लॉकडाऊनवर भाष्य करणारी ‘अनपॉझ्ड – नया सफर’ वेबसीरिज, या दिवशी होणार रिलीज

कधी निराशने, तर कधी आशेने लोक हा काळ जगले. हाच लॉकडाऊनचा अनुभव प्राइम व्हिडीओने अनपोज्ड च्या आधीच्या सीरिजच्या माध्यमातून मांडण्यात आला होता.

amazon prime video announces the launch of the unposed naya safar
लॉकडाऊनवर भाष्य करणारी 'अनपॉझ्ड - नया सफर' वेबसीरिज, या दिवशी होणार रिलीज

मार्च 2020 पासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. दरम्यान या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला, मात्र याचा फटका देशातील प्रत्येक नागरिकाला बसला. लोकांची जीवनशैली बदलली आणि अनेकांना आंबट गोड अनुभवातून जावे लागले. त्यामुळे कधी निराशने, तर कधी आशेने लोक हा काळ जगले. हाच लॉकडाऊनचा अनुभव प्राइम व्हिडीओने अनपोज्ड या सीरिजच्या माध्यमातून मांडलाय. या वेबसीरिजच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने आता या वेबसीरिजाचा सिक्वेल ‘अनपोज्ड – नया सफर’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 21 जानेवारीला हा सिक्वेल amazon prime video प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

या अँथॉलॉजी सिक्वेल सीरिजमध्ये पाच हिंदी शॉर्ट फिल्म दाखवल्या जातील, यात कोरोना महामारीच्या काळात सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला जाईल, तसेच सकारात्मक दृष्टिकोनातून याकडे कसे पाहिले पाहिजे हे या ‘लॉकडाउन स्पेशल’ अँथॉलॉजी फिल्मच्या माध्यमातून सांगितले जाईल.

तिगडा, द कपल, गोंदू के लड्डू, वॉर रूम आणि वैकुंठ असे या पाच हिंदी शॉर्ट फिल्मची नावे आहेत. त्यांचे दिग्दर्शन अनुक्रमे रुचिर अरुण, नुपूर अस्थाना, शिखा माकन, अयप्पा केएम आणि नागराज मंजुळे यांनी केले आहे.

‘लॉकडाउन स्पेशल’ अनपोज्ड सीरिज

१) तीन तिगाडा: साकिब सलीम, आशिष वर्मा आणि सॅम मोहन प्रमुख भूमिकेत आहेत.

२) द कपल: श्रेया धन्वंतरी, प्रियांशू पेन्युली

३) गोंद के लड्डू: दर्शन राजेंद्रन, अक्षवीर सिंग सरन आणि नीना कुलकर्णी

४) वॉर रूम: गीतांजलि कुलकर्णी, रसिका अगाशे, पूर्णानंद वांदेकर और शरवरी देशपांडे

५) वैकुंठ : अर्जुन करचेंद, हनुमंत भंडारी

2020 मध्ये रिलीज झालेले अनपॉज्ड सीरिज

अनपॉज्ड 18 डिसेंबरला रिलीज झाली होती. यात ग्लिच, रॅट-ए-टॅट, विषाणू, चांद मुबारक आणि अपार्टमेंट नावाच्या पाच शॉर्टफिल्मचा समावेश होता. यातील ग्लिचचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले होते. यात गुलशन देवैया आणि सन्यम खेर मुख्य भूमिकेत होते. अपार्टमेंटचे दिग्दर्शन निखिलने केले होते, ज्यात रिचा चढ्ढा, सुमीत व्यास आणि इश्वाक सिंग मुख्य भूमिकेत होते. रॅट-ए-टॅटचे दिग्दर्शन तनिष्ठा चॅटर्जी यांनी केले होते आणि यात रिंकू राजगुरू आणि लिलेट दुबे यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. तर विषाणूचे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केले होते. यात अभिषेक बॅनर्जी आणि गीतिका विद्या ओहल्यान मुख्य भूमिकेत होते. याशिवाय चांद मुबारकचे दिग्दर्शन नित्या मेहरा यांनी केले होते. यात रत्ना पाठक शाह आणि शार्दुल भारद्वाज मुख्य भूमिकेत होते.


RRR सिनेमा रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात ; तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल