घरताज्या घडामोडीUnpaused Naya Safar: 'अनपॉज्ड: नया सफर' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Unpaused Naya Safar: ‘अनपॉज्ड: नया सफर’ मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

“नया सफर’चं गाणे हे कृतज्ञता आणि नवीन आरंभावर आधारलेले आहे. आपण सगळं गमावले असं जाणवण्याची वेळ जीवनात येते. आशेचा किरण हरवून जातो त्यावेळी मात्र आपण आत्मशक्ति आणि दृढतेवर विश्वास ठेवला पाहिजे."

आगामी अमेझॉन ओरीजनल (Amazon Original )  नया सफरचा ट्रेलर लॉन्च (Unpaused: Naya Safar Trailer)  झाल्यानंतर या स्ट्रीमिंग सेवेच्या वतीने आज कथामालिकेच्या लक्षवेधी आणि मनमोहक शीर्षक गीताचे प्रकाशन करण्यात आले. सचिन-जिगर (Sachin-Jigar) यांनी हे शीर्षक गीत संगीतबद्ध केले आहे, या गाण्यात आशा आणि सकारात्मकतेचा संदेश अधोरेखित होतो. याच सूत्राभोवती हे कथानक फिरते. अमित मिश्रा (Amit Mishra)  यांनी हे गाणे गायले असून शेखस्पीयरने रॅप म्हटले आहे. कौसर मुनीर (Kauser Munir)  हे नया सफरचे गीतलेखक आहेत.

गाण्याबद्दल अधिक माहिती देताना संगीतकार द्वयी सचिन संघवी आणि जिगर सरैय्या म्हणाले की, “नया सफर’चं गाणे हे कृतज्ञता आणि नवीन आरंभावर आधारलेले आहे. आपण सगळं गमावले असं जाणवण्याची वेळ जीवनात येते. आशेचा किरण हरवून जातो त्यावेळी मात्र आपण आत्मशक्ति आणि दृढतेवर विश्वास ठेवला पाहिजे. जीवनाला त्यामुळे चालना मिळत असते. कोणत्याही स्थितीशी मुकाबला करण्याची ताकद येते आणि एका विजेत्याप्रमाणे मार्गक्रमणा करणे शक्य होते. नया सफर गाणे प्रेरणादायक आहे, ते ऐकणाऱ्याच्या मनात आशा आणि सकारात्मकता भरते. मनाला उभारी देते. कौसर मुनीर यांच्या शब्दांनी सुंदररितीने गीताचा आत्मा आणि सार पकडले आहे, तर अमित मिश्राच्या आवाजाने गाण्याला न्याय मिळाला आहे. शेखस्पीयरच्या रॅपने गाण्यात आणखी एका घटकाची भर घातली आहे. प्रेक्षक नया सफरची मजा घेतील ही आशा!”

- Advertisement -

‘अनपॉज्ड: नया सफर’मध्ये पाच अभिनव कथांचा समावेश असून त्या आशा, सकारात्मकता आणि नवीन आरंभाचा झरोका आहेत. त्या आपल्याला जीवन आणि भावनांना महत्त्व द्यायला शिकवतात. या कथांमधून प्रेम, उत्कंठा, भीती आणि मैत्री अशा अस्सल मानवी भावनांचे दर्शन घडते – शिखा माकन (गोंद के लड्डू), रुचिर अरूण (तीन तिगाडा), नूपुर अस्थाना (द कपल), अय्यप्पा केएम (वॉर रूम) आणि नागराज मंजुळे (वैकुंठ) या फिल्ममेकरनी कथा जिवंत केल्या आहेत. 21 जानेवारी 2022 पासून ‘अनपॉज्ड: नया सफर’चे स्ट्रीमिंग भारतासह 240 देश-प्रदेशांतील प्राईम सदस्यांसाठी उपलब्ध असेल.


हेही वाचा – Gond Ke Laddu: ‘गोंद के लड्डू’ साध्या मानवी भावनांची कथा आहे – नीना कुळकर्णी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -