घरमनोरंजनAmazone prime video:'मुंबई सागा' अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर जाहीर !

Amazone prime video:’मुंबई सागा’ अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर जाहीर !

Subscribe

मुंबई सागा' या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर जाहीर करण्यात आलं आहे

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने ‘मुंबई सागा’ या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर जाहीर करण्यात आलं आहे. अॅमेझोन प्राइम व्हिडिओ या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे . अॅमेझोन प्राइम सदस्य अॅमेझोन प्राइम व्हिडिओवर 27 एप्रिल 2021 रोजी पाहू शकतात.
संजय गुप्ता दिग्दर्शित ‘मुंबई सागा’ चित्रपटात महेश मांजरेकर, काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, प्रितीक बब्बर, रोहित रॉय, अमोल गुप्ते, समीर सोनी, गुलशन ग्रोव्हर आणि अंजना सुखानी यांच्यासह जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत. टी-सीरीज़ व व्हाइट फेदर फिल्म्सच्या बॅनरखाली भूषण कुमार, कृष्णा कुमार, अनुराधा गुप्ता आणि संगीता अहिर यांनी निर्मित केला आहे. चित्रपटाची कथा ही काल्पनिक असून ९० च्या दशकापासून अमर्त्य राव (जॉन अब्राहम) आणि सीनियर इंस्पेक्टर विजय सावरकर (इमरान हाश्मी) यांनी मुंबईच्या पार्श्वभूमीवर असलेल्या आशा, आकांक्षा, मैत्री आणि विश्वासघात यांच्या वेगवेगळ्या पैलूंचा शोध घेते . सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आधी मुंबई हे बॉम्बे म्हणून ओळखलं जात असे त्याचे रूपांतर मुंबईत कशाप्रकारे झाले ही कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

- Advertisement -

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडिया इंडियाचे कंटेंट डायरेक्टर आणि हेड विजय सुब्रमण्यम म्हणाले की, “आमच्या व्यासपीठावर अ‍ॅक्शन चित्रपटांबद्दल ग्राहकांकडून आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्याकडून आम्हाला सतत पुढे जाण्यासाठी प्रेरणा निर्माण होत आहे”मुंबई सागा थरारक चित्रपटांमध्ये एक रोमांचक भर आहे, ज्यात बॉलिवूडमधील काही सर्वोत्कृष्ट स्टार आहेत. “मुंबई सागा माझ्यासाठी खूप खास प्रोजेक्ट आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या लोकप्रिय व्यासपीठावर या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर झाल्यास प्रेक्षकांन पर्यंत पोहोचण्यास मदत कारेन”दिग्दर्शक संजय गुप्ता यावेळेस म्हणाले.


हे हि वाचा – आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते वामन भोसले यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -