Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Amazone prime video: 'फोटो प्रेम' मराठी चित्रपटाचा प्रिमिअर ७ मे रोजी, ट्रेलर...

Amazone prime video: ‘फोटो प्रेम’ मराठी चित्रपटाचा प्रिमिअर ७ मे रोजी, ट्रेलर रिलिज

फोटो प्रेम' या चित्रपटातील माईची गोष्ट शक्य तितक्या विस्तृत पातळीवर दाखविली गेली पाहिजे. हा चित्रपट सर्वांना पाहावा असा आहे

Related Story

- Advertisement -

अॅमेझॉन प्राइम व्हिडियो आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्यातर्फे ‘फोटो प्रेम’ या आगामी मराठी चित्रपटाचा प्रीमिअर भारतात ७ मे रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या वेळी चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटात दिग्गज अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची मध्यवर्ती भूमिका आहे त्याचप्रमाणे अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.’फोटो प्रेम’ ही ‘माई’ या व्यक्तिरेखेची कथा आहे. आपल्या ‘जुन्या फोटो’मध्ये आपण तितकेसे छान दिसत नसल्यामुळे आपल्या मृत्यूनंतर सर्वांना आपला विसर पडेल याची माईला चिंता असते. माईचा कॅमेऱ्याची भीती घालविण्याचा आणि शेवटी भीतीवर मात करून परफेक्ट फोटो काढण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटात दाखविण्यात आला आहे. ‘फोटो प्रेम’ या चित्रपटाची निर्मिती आदित्य राठी, मेहुल शहा आणि गायत्री पाटील यांची आहे आणि आदित्य राठी व गायत्री पाटील या दोघांनी तो संयुक्तपणे लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.

या ट्रेलरमध्ये माईच्या आयुष्याची झलक दिसते. माई एका मृत व्यक्तीचा लहानपणीचा फोटो पाहून चिंतीत होताना दिसते. तिचे अलीकडील फारसे फोटो उपलब्ध नसल्याने तिच्या मृत्यूनंतर लोक तिला कसे लक्षात ठेवतील, याचा ती विचार करू लागते. त्यानंतर एक परफेक्ट फोटो काढण्यासाठी माईचा उत्कंठावर्धक प्रवास सुरू होतो.
दिग्गज कलाकार आणि मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना कुलकर्णी म्हणाल्या, “’फोटो प्रेम’ ही अत्यंत बारकावे टिपणारी आणि विचार करायला लावणारी कथा आहे आणि या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका निभावता येणे हे कोणत्याही बहुमानापेक्षा कमी नाही. चित्रपटात एक निरागस आणि विशुद्ध भावना दर्शविण्यात आली आहे आणि व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. ‘फोटो प्रेम’ या चित्रपटातील माईची गोष्ट शक्य तितक्या विस्तृत पातळीवर दाखविली गेली पाहिजे. हा चित्रपट सर्वांना पाहावा असा आहे आणि ज्या प्रेमाने आम्ही हा चित्रपट तयार केला तेवढेच प्रेक्षकांचेही प्रेम या चित्रपटाला लाभेल, अशी मला आशा आहे.”


- Advertisement -

हे हि वाचा – इंडियन आइडल शो मधून नेहा कक्कड गायब, शो मध्ये पुन्हा झळकणार अनु मलिक

- Advertisement -