Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन फ्रान्सचे राजदूतही शाहरुखचे चाहते; फोटो शेअर करत केलं कौतुक

फ्रान्सचे राजदूतही शाहरुखचे चाहते; फोटो शेअर करत केलं कौतुक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. शाहरुखला पाहण्यासाठी अनेकजण दररोज त्याच्या घराबाहेर थांबून त्याची वाट पाहत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटामुळे शाहरुख पुन्हा चर्चेत आला. या चित्रपटातील शाहरुखचा दमदार अभिनय आणि डान्स पाहून अनेकांना भुरळ पडली. दरम्यान, अशातच सोशल मीडियावर भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी शाहरुख खानसोबत काढलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत लेनेन यांनी शाहरुखसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

रविवारी, भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ते शाहरुख खानसोबत दिसत आहेत. या फोटोसोबत इमॅन्युएल लेनेनने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मुंबईमध्ये शाहरुख खानला भेटलो. मी त्याला पुन्हा फ्रान्समध्ये येऊन शूट करण्याचा आग्रह केला. फ्रेंच लोकांना बॉलिवूड आणि त्याला पाहायला आवडेल.” फ्रेंच राजदूताच्या या पोस्टवरून तोही शाहरुख खानचा खूप मोठा चाहता आहे, याचा सहज अंदाज लावण्यात येत आहे.

अंबानींच्या कार्यक्रमादरम्यान झाली होती भेट

- Advertisement -

खरं तर, शाहरुख खान आणि फ्रेंच राजदूत इमॅन्युएल लेनन यांचा हा फोटो नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इव्हेंटमध्ये काढण्यात आला होता. या खास कार्यक्रमात इमॅन्युएल लेनन यांना शाहरुखला भेटण्याची खास संधी मिळाली. इमॅन्युएल लेनन आणि शाहरुख खानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

अयोध्येचा ऋषी सिंह ठरला ‘इंडियन आयडल 13’ चा विजेता

- Advertisment -