Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अमीषा पटेलवर अडीच कोटीच्या फसवणुकीचा आरोप; कोर्टाकडून वॉरंट जारी

अमीषा पटेलवर अडीच कोटीच्या फसवणुकीचा आरोप; कोर्टाकडून वॉरंट जारी

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल सध्या तिच्या आगामी ‘गदर 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेक वर्षांनंतर अमीषा पुन्हा एकदा सिल्वर स्क्रीनवर झळकणार आहे. दरम्यान, अशातच अमीषा आणि तिच्या बिझनेस पार्टनरविरोधात रांची सिव्हिल कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. अमिषा पटेलशी संबंधित हे संपूर्ण प्रकरण चेक बाऊन्स आणि फसवणुकीशी निगडीत आहे. हे प्रकरण काही काळापूर्वी देखील चर्चेत आलं होतं. मात्र, आता दिवसेंदिवस हे अधिक वाढत चालल्याचे दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्टाची तारीख असूनही अमिषा आणि तिचे वकील कोर्टात पोहोचले नाहीत. अमीषाच्या या वृत्तीवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिलला होणार आहे. वॉरंट जारी झाल्यानंतर अमिषा यावेळी न्यायालयात पोहोचते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अमीषा पटेलवर अडीच कोटीच्या फसवणूकीचा आरोप

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

- Advertisement -

अमीषा आणि तिच्या बिझनेस पार्टनरविरोधात जवळपास डीच कोटीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रांची जिल्ह्यातील हरमू येथील रहिवासी अजय कुमार सिंह यांनी अमिषा आणि तिच्या बिझनेस पार्टनरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीनुसार, अमिषाने अजय कुमार सिंह यांना देसी मॅजिक नावाच्या चित्रपटाची ऑफर देताना पैशांची ऑफर दिली होती. यानंतर तक्रारदाराने अभिनेत्रीच्या खात्यात सुमारे अडीच कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. 2013 मध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार होती, ती कधीच सुरू झाली नाही. जेव्हा अजय कुमार सिंगने त्याचे पैसे परत मागितले तेव्हा अमिषाने त्याला चित्रपट पूर्ण झाल्यानंतर व्याजासह पैसे परत करु असे आश्वासन दिले.

- Advertisement -

त्यानंतर 2018 मध्ये, अमीषा पटेलने 2.5 कोटी आणि 50 लाख रुपयांचे दोन चेक अजय कुमारला बराच वेळ वाट पाहिल्यानंतर दिले, जे बाऊन्स झाले होते. त्यामुळे त्यांने अमिषाच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली. सीआरपीसी कलम 420 आणि 120 अंतर्गत अमीषा आणि तिच्या बिझनेस पार्टनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


हेही वाचा :

सांस्कृतिक कलादर्पण’ पुरस्कार सोहळ्यात ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ चित्रपटाला सर्वाधिक नामांकने

- Advertisment -