घरमनोरंजनअमिषा पटेलने केली २.५ कोटींची फसवणूक; निर्मात्याने केला गुन्हा दाखल

अमिषा पटेलने केली २.५ कोटींची फसवणूक; निर्मात्याने केला गुन्हा दाखल

Subscribe

चित्रपट निर्माते अजयने अमिषा पटेल आणि कुणालच्या देसी मॅजिक या चित्रपटासाठी २.५ कोटी रूपये दिले होते.

अभिनेत्री अमिषा पटेल ही बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर असल्याचे दिसत आहे. परंतु ती कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिच्यावर फसवणूकीचा आरोप केला जात आहे. चित्रपट निर्माता अजय कुमार सिंहने झारखंडच्या रांचीमध्ये अमिषाच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. रांचीचे असणारे चित्रपट निर्मात्यांनी अमिषासोबत बिझनेस पार्टनर कुणाल ग्रूमर विरूद्धही फसवणूकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

 

View this post on Instagram

 

?????

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on


या आरोपात निर्मात्याने असे सांगितले की, अमिषाने एका चित्रपटाकरिता चित्रपट निर्माते अजय कडून २.५ कोटी रूपये घेतले होते. मुंबई मिररच्या अहवालानुसार, चित्रपट निर्माते अजयने अमिषा पटेल आणि कुणालच्या देसी मॅजिक या चित्रपटासाठी २.५ कोटी रूपये दिले होते. २०१३ मध्ये हा चित्रपट तयार होण्यास सुरूवात झाली होती.

 

View this post on Instagram

 

????

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

- Advertisement -

अमिषाने त्यांना असे सांगितले की, हा चित्रपट २०१८ पर्यंत पुर्ण होऊन प्रदर्शित केला जाईल. चित्रपट रिलीज झाल्यानंतर २.५ कोटी रूपयाचे व्याज असेल त्यानुसार पैसे परत देईन. पंरतु, निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, आता पर्यंत चित्रपट प्रदर्शित झालाच नाही. यावर अमिषाशी निर्माते अजय बोलले असता; अमिषाने ३ करोडचा चेक दिला होता पण तो चेक बाऊंस झाला. याची माहिती अमिषीला दिली असता, तिने पैसे परत करणार नाही असे सांगितले.

 

View this post on Instagram

 

???

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

- Advertisement -

या प्रकरणात अमिषाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. एवढेच नाही तर, चित्रपट निर्मात्याशिवाय एका इव्हेंट कंपनीनेही अमिषावर फसवणूक करण्याचा एक आरोप केला आहे. अमिषा सोबत इतर चार जणांवर देखील फसवणूकीचा आरोप केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -