अमेरिकेची अभिनेत्री केके व्याट देणार ११ व्या मुलाला जन्म

अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका केके व्याट ही तिच्या ११ व्या मुलाला जन्म देणार आहे, तिने तिच्या सोशल मिडियावर बेबी बंप फोटोशूटसोबत ही बातमी शेयर केली आहे. तिचे चाहते ही बातमी बघताचं आश्चर्यचकित झाले आहेत. केके व्याटची एकूण १० मुलं आहेत, तिची ३ लग्रं झाली आहेत.

अभिनेत्री आणि गायिका केके व्याटने तिच्या सोशल मिडियावर ही बातमी सांगून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. केके व्याटने तिचे प्रेग्नन्सी दरम्यानचे फोटो शेयर करून लिहिलयं की, माझे पती जकारिया डेविड डेरिंग आणि मला ही गोष्ट सांगताना गर्व वाटत आहे की, व्याट कुटुंबामध्ये अजून एक मुल जन्माला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Keke Wyatt (@keke_wyatt)

केके व्याट आणि जकारिया डेविड यांचं २०१८ मध्ये लग्न झालं होतं. याआधी केके व्याटची दोन लग्न झाली होती. केके व्याटने १८ व्या वर्षी तिचा मॅनेजर रहमत मोर्टम याच्याशी लग्न केलं होतं, परंतु काही वर्षानंतर त्यांच्यामध्ये कौटुंबिक मारहाण आणि घरगुती अत्याचाराच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे २००९ मध्ये केके व्याटच्या रहमतसोबत घटस्फोट झाला. रहमत आणि केके ३ मुलांचे पालक आहेत.

घटस्फोटच्या २ वर्षानंतर केकेने माइकल जमार फोर्ड सोबत लग्न केलं, केकेने माइकल सोबत तिच्या ६ मुलांचा सांभाळ केला. २०१७ पर्यंत केके ८ मुलांची आई झाली होती. त्यानंतर २०१८ मध्ये केकेने मायकलसोबत सुद्धा घटस्फोट घेतला. त्याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात केकेने तिच्या लहानपणीच्या मित्राबरोबर लग्न केलं. हे केकेचे तिसरं लग्न असून जकारिया आणि केकेची २ मुलं आहेत आणि आता ती अजून एका मुलाची आई होणार आहे. हे केकेचं ११ वं मुल असणार आहे.


हेही वाचा : Sansad Ratna Award : खासदार सुप्रिया सुळेंना सलग ७ व्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर