घरताज्या घडामोडीAmir Ali-Sanjeeda Shaikh Divorced: 9 वर्षाच्या संसारानंतर आमिर अली आणि संजीदा शेख...

Amir Ali-Sanjeeda Shaikh Divorced: 9 वर्षाच्या संसारानंतर आमिर अली आणि संजीदा शेख यांचा घटस्फोट

Subscribe

दोघांच्या घटस्फोटाला आता ९ महिने होऊन गेले आहेत. दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. घटस्फोटाबाबत दोघांनीही फार गुप्तता पाळली होती.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी म्हणजे आमिर अली (Amir Ali) आणि संजीदा शेख (Sanjeeda Shaikh Divorced)  मात्र प्रेक्षकांची ही लाडकी जोडी आता एकमेकांपासून कायमची दूर झाली आहे. आमिर अली आणि संजीदा शेख यांनी घटस्फोट घेतला (Amir Ali-Sanjeeda Shaikh Divorced)  असून त्यांच्या या निर्णयाने फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्तान लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार दोघांच्या घटस्फोटाला आता ९ महिने होऊन गेले आहेत. दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. घटस्फोटाबाबत दोघांनीही फार गुप्तता पाळली होती. दोघेही त्यांच्या घटस्फोटाबाबत कोणतेही वक्तव्य करण्यास तयार नाही.

- Advertisement -

नच बलिये 8 मध्ये आमिर आणि संजीदा हे स्पर्धक म्हणून एकत्र दिसले होते. त्यानंतर ते एकमेकांना डेट करत होते. आमिर अली आणि संजीदा शेख यांनी 2012मध्ये लग्न केले. दोघांना २ वर्षांची मुलगी आहे. २०२० दरम्यान त्याच्या नात्याविषयीच्या काही उलट सुलट माहिती समोर आली होती. घटस्फोट होण्याआधी त्यांनी सरोगसीद्वारे एक बाळ झाले आहे अशा देखील अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

आमिर आणि संजीदा यांच्या घटस्फोटानंतर त्यांची 2 वर्षांची मुलगी आयरा हिची कस्टडी संजीदाकडे देण्यात आली आहे. सध्या मुलीला घेऊन संजीदा तिच्या आईच्या घरी राहते. आमिर आणि संजीदा या दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यास नकार दिला आहे. आमच्या घटस्फोटाबाबत मला कोणतीही टिप्पणी करायची नाही असे संजीदाने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Ali (@aamirali)

संजीदा तिच्या मुलीबाबत फार पझेसिव्ह आहे. संजीदाने मुलीविषयी म्हटले आहे की, मी फक्त माझ्या मुलीला खुश ठेवू इच्छिते. तर दुसरीकडे आमिरने, संजीदा तिच्या आयुष्यात सगळे आनंद मिळूदेत तिने नेहमी तिचे आयुष्य आनंदात घालवावे,असे म्हटले आहे.

2021 वर्षात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ज्यात आमिर खान किरण राव यांनी घटस्फोट घेतला. तर समांथा प्रभू आणि नागा चैतन्य देखील नात्यातून विभक्त झाले. तर दुसरीकडे अभिनेत्री नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांनी देखील घटस्फोट घेतला. 2022मध्ये आमिर आणि संजीदा यांच्या घटस्फोटामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना नाराज केले आहे.


हेही वाचा – Amir Khan: आमिर खानने फातिमा सना शेख सोबत केलं लग्न? व्हायरल फोटोमागे ‘हे’ आहे सत्य

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -