आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर भाऊ फैजल खानचे मोठे विधान,दुसऱ्या लग्नाविषयी म्हणाला…

किरण आणि आमिर यांना त्यांचे भल कशात आहे हे कळते.

Amir khan brother Faizal Khan reaction on divorce of Aamir and Kiran Rao
आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर भाऊ फैफैजल खानचे मोठे विधान,दुसऱ्या लग्नाविषयी म्हणाला...

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घटस्फोटामुळे चर्चत आहे. आमिरचा भाई फैसल खान ( Faizal Khan ) हा देखील पुन्हा एकदा फॅक्टरी (Factory) हा नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. फैसल खानने याआधी आमिर खानसोबत काम केले आहे. सिनेमाच्या निमित्त फैसलला आमिर आणि किरण राव (Kiran Rao) यांच्या घटस्फोटाबाबत विचारण्यात आले यावेळी फैसलने महत्त्वाचे विधान केले आहे जे ऐकून सगळेच अवाक झालेत.

आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला त्यावेळी एका इंग्रजी वृत्तपत्राला फैसल खानने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी त्याने आपल्या फिल्मी करियर त्याशिवाय वयक्तिक आयुष्याविषयीही बरीच माहिती दिली. आमिर आणि किरण यांच्या घटस्फोटोविषयी त्यांनी चर्चा केली मात्र त्याच्या वयक्तिक आयुष्याविषयी विचारले असता मी अजून इतके पैसे कमावलेले नाही की मी बायको आणि गर्ल फ्रेंड ठेवू शकतो. आजकाल गर्ल फ्रेंड ठेवणे ही महाग झाले आहे. फॅक्टरी सिनेमा रिलीज झाल्यानंतर मी एक गर्ल फ्रेंड ठेवण्याचा विचार करेन असे मजेशीर उत्तर फैसल खानने दिले.

पुढे फैसलने म्हटले की, ‘आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाविषयी मी काहीही बोलणार नाही कारण माझे पहिले लग्न देखील फार काळ टिकले नाही. किरण आणि आमिर यांना त्यांचे भल कशात आहे हे कळते. त्यामुळे मी त्यांच्यात बोलणे किंवा सल्ला देण्याचा प्रश्न नाही’, असे फैसल खान याने म्हटले.


हेही वाचा – Indian Film Festival of Melbourne: ‘मिर्झापूर 2’ ठरला बहुचर्चित क्राइम ड्रामा