घरताज्या घडामोडीLal Singh Chaddha: देशातील शंभर लोकेशन्सवर २०० दिवसात चित्रीत केला 'लाल...

Lal Singh Chaddha: देशातील शंभर लोकेशन्सवर २०० दिवसात चित्रीत केला ‘लाल सिंह चड्डा’

Subscribe

परफेक्शनिस्ट अमिर खानची निर्मिती असलेला लाल सिंह चड्डा हा सिनेमा नव्या वर्षात १४ एप्रिल २०२२ला रिलीज होणार आहे. देशातील पाच दशकांहून अधिक इतिहास आमिर या सिनेमात मांडणार आहे. आमिर खानच्या लगान या सिनेमानंतर आमिरचा दुसरा सर्वात मोठा सिनेमा आहे. आमिरने १०० वेगवेगळ्या ठिकाणांवर या सिनेमाचे शुटींग तब्बल २०० दिवसात संपवलं आहे. आमिरने आतापर्यंत त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा वेळ या सिनेमासाठी खर्च केला आहे.

देशातील पाच दशकांहून अधिकचा इतिहास आमिर या सिनेमात मांडणार  आहे. देशात पाच दशकात घडलेल्या विविध राजकीय, लष्करी आणि भारताच्या भौगोलिक घटनांच्या पार्श्वभूमीवर घडलेली कथा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.  ऑपरेशन ब्लू स्टार आणि बाबरी मस्जिदच्या विध्वंसावर हा सिनेमा आधारित असणार आहे. आमिर खान यात एका सिख भूमिकेत दिसणार आहे आणि अभिनेत्री करिना कपूर आमिर खानच्या प्रेमीकेच्या भूमिकात दिसणार आहे.

- Advertisement -

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शीत २००१मध्ये आलेल्या लगान या सिनेमाचे शुटींग अनेक दिवस मोठ्या प्रोसेसमध्ये सुरू होते. आमिर खानच या सिनेमात प्रमुख भूमिकेत होता. लाल चड्डा या सिनेमाने बॉलिवूडमधील आतापर्यंतच्या सगळ्या सिनेमांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. संपूर्ण सिनेमाचे चित्रकरण हे भारतातील एकूण १०० हून अधिक ठिकाणी करण्यात आले आहे. आमिरला या सिनेमासाठी प्रचंड मानसिक तयारी करावी लागली होती. जवळपास २०० दिवसात आमिरने या सिनेमाचे शुटींग पूर्ण केले.

- Advertisement -

आणखी एक खास गोष्ट म्हणजे परफेक्शनिस्ट आमिर खानने या सिनेमाच्या शुटींगदरम्यान वेळी त्याची परफेक्ट बाजू दाखवून दिली. आमिर मोबाईल पासून आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे स्वत:ला दूर ठेवले होते. कारण २०० दिवसांच्या शुटींगच्या काळात त्याला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नको होता. म्हणून अमिरने त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वात अमूल्य वेळ या सिनेमाला दिलाय असे म्हटले जात आहे.

देशात घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटना अडीच तीन तासात मांडणारा भारतातला हा पहिलाच सिनेमा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक घटना सिनेमात कशी मांडली जाणार आणि कशाप्रकारे प्रकारे प्रेक्षकांपर्यत पोहचवली जाणार हेच पाहणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

हा सिनेमा खरंतर देशातील नव्या पिठीसाठी तयार करण्यात आलाय. कारण सिनेमातून देशाचा इतिहास हा नि: पक्षपातीपणे आणि कोणत्याही प्रकारची राजकीय टिप्पणी न करता प्रेक्षकांसमोर मांडण्याचा आमिर खानचा प्रयत्न आहे. १४ मार्च २०१९मध्ये आमिर खानच्या वाढदिवसाला सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. २५ डिसेंबर २०२० ला सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सिनेमा लांबणीवर पडला. आता हा सिनेमा १४ एप्रिल २०२२ ला रिलीज होणार आहे.

ऑस्कर विजेत्या फॉरेस्ट गंप या अमेरिकी सिनेमाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. लगान, तारे जमीन पर,दंगल सारख्या सिनेमातून आमिरने  वेगळे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहचवले आहेत. आता आमिर लाल चड्डा प्रेक्षकांच्या कसा पसंतीस उतरतो हे लवकरच कळेल.


हेही वाचा – ‘मला मुलांची आठवण येतेय’, कोरोना पॉझिटिव्ह Kareena मुलांच्या आठवणीत भावूक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -