अमिर खान बनला थुकरटवाडीचा गावकरी

लवकरच या मंचावर मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान आणि किरण राव धम्माल करताना दिसणार आहे.या मंचावर येऊन आमिर खानने सर्वच कलाकारांशी त्याच्या खास स्टाईलनं संवाद साधला.

Amir khan

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. सोमवारी आणि मंगळवारी प्रेक्षक पोटभरून हसतात. प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम चला हवा येऊ द्या करतो. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. या मंचाची भूरळ केवळ मराठी सेलेब्रेटींना नाही तर बॉलिवूडलाही पडली आहे. लवकरच या मंचावर मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान आणि किरण राव धम्माल करताना दिसणार आहे.

या आधी या मंचावर थुकरटवाडीमध्ये शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम, अक्षय कुमार, इरफान खान, अजय देवगण, रितेश देशमुख यासारख्या मंडळींने हजेरी लावली आहे आणि आता दुसऱ्यांदा या मंचावर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान आणि किरण राव येणार आहेत.

 

View this post on Instagram

 

The cutest in the world… mazi baiko ❤

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

 आमिर आणि किरण बनले थुकरटवाडीचे गावकरी

या मंचावर येऊन आमिर खानने सर्वच कलाकारांशी त्याच्या खास स्टाईलनं संवाद साधला. सेटवर लाडक्या विनोदवीरांनी रंगीला या चित्रपटावर एक स्कीट सादर केलं. एवढंच नाहीतर कार्यक्रमात आमिर खान आणि किरण राव या दोघांनी एक स्किट सादर केलं आणि त्यासाठी ते दोघंही गावकरी बनले. पाणी कसं वाचवावं आणि त्याचा साठा कसा करावा यावर माहिती देणारं स्किट आमिर खान आणि किरण राव यांनी सादर केलं आणि त्यासाठी त्यांनी मराठमोळा वेष परिधान केला. इतकंच नव्हे तर आमिर खानने त्याचा आणि किरणचा या लूकमधील फोटो सोशल मीडियावर टाकला आणि हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. हा भाग १ आणि २ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.