आमिर खानने श्रीदेवीबरोबर काम करण्यास दिला होता नकार

आमिर खान याने एकेकाळची सुपरस्टार असलेली अभिनेत्री श्रीदेवीबरोबर काम करण्यास नकार दिला होता.

मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान याने एकेकाळची सुपरस्टार असलेली अभिनेत्री श्रीदेवीबरोबर काम करण्यास नकार दिला होता. आमिरने एका मनोरंजन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत स्वत:च हा खुलासा केला आहे.

आमिरने याबदद्ल सांगितले की ही घटना त्याचा पहीला सुपरहीट सिनेमा कयामत से कयामत नंतर घडली होती. कयामत से कयामत या चित्रपटाने आमिर आणि जुही एका रात्रीत सुपरस्टार झाले होते. दोघेही पंचविशीच्या आत होते. त्यांची जोडी प्रेक्षकांना पंसत पडली होती.कयामतला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे आमिरकडे निर्मात्यांच्या रांगा लागल्या होत्या.

त्याचवेळी एका निर्मात्याने आमिरला श्रीदेवीबरोबर हिरो म्हणून काम करण्याची ऑफर दिली. पण श्रीदेवी आमिरपेक्षा वयाने मोठी असल्याने प्रेक्षकांना ही जोडी पसंत पडणार नाही, चित्रपट चालणार नाही. असे आमिरने निर्मात्याला स्पष्ट सांगितले.
कयामत से कयामतमध्ये आमिरने एका कॉलेज मुलाची भूमिका केली होती. त्यानंतर जर थेट त्याच्यापेक्षा वयस्क श्रीदेवीच्या हिरोची भूमिका केली असती तर ते त्याच्या करियरच्या दृष्टीनेही त्याला रिस्की वाटले होते. यामुळे त्याने निर्मात्याला नम्रपणे नकार दिला.

त्यानंतर आमिरने माधुरी दिक्षित,जूही चावलासह, मनिषा कोईराला, रानी मुखर्जी या अभिनेत्रींबरोबर काम केले. यादरम्यान आमिरने श्रीदेवीबरोबर फोटो शूटही केले होते.