घरमनोरंजनलालसिंग चड्ढा चित्रपटाला १०० कोटींचा फटका

लालसिंग चड्ढा चित्रपटाला १०० कोटींचा फटका

Subscribe

विकेंडला हा चित्रपट 50 कोटींचीही कमाई करू शकला नाही. दरम्यान या चित्रपटाकडून आमीर खानच्या सुद्धा खुप अपेक्षा होत्या. त्यासुद्धा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान(amir khan) याचा लाल सिंग चड्ढा(lal singh chaddha) हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन होऊन 9 दिवस झाले आहेत. लाल सिंग चड्ढा हा चित्रपट या वर्षातील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक होता. पण चित्रपट प्रदर्शित झाला त्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला त्या नंतर संपूर्ण विकेंडला सुद्धा हा चित्रपट प्रेकक्षकांच्या प्रतीक्षेतच गेला. संपूर्ण विकेंडला हा चित्रपट 50 कोटींचीही कमाई करू शकला नाही. दरम्यान या चित्रपटाकडून आमीर खानच्या सुद्धा खुप अपेक्षा होत्या. त्यासुद्धा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

हे ही वाचा – सारा अली खान आणि जान्हवी कपूर करणार एकत्र काम; पोस्ट शेअर करत केला खुलासा

- Advertisement -

आमिर खानचे 100 कोटींहून अधिक नुकसान

‘लाल सिंह चड्ढा'(lal singh chaddha) चित्रपट प्रदर्शित होऊन 9 व्या दिवशीच्या चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर, चित्रपटाने 1 ते 1.25 कोटी एवढाच गल्ला कमावला. एका अहवालात नमूद केले आहे की आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाला 100 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान हा चित्रपट बनविण्यासाठी 180 कोटी एवढे बजेट होते. पण त्या तुलनेत हा चित्रपट तेवढी कमाई करू शकला नाही. बॉलिवूड मधील सलमान खान शाहरुख खान यांच्या फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांपैकी आमिर खानचा लाल सिंघ चड्ढा हा चित्रपट खूपच फ्लॉप ठरला.

- Advertisement -

हे ही वाचा – सौंदर्याचा मुद्दा येतो तेव्हा… श्रुती मराठे नेमकं काय म्हणाली?

दरम्यान अभिनेता आमिर खानने(actor amir khan)  एका मुलाखतीत सांगितले की, लाल सिंघ चड्ढा हा चित्रपट बनविण्यासाठी आम्ही 4 वर्षे या चित्रपटावर काम केले आहे. हा चित्रपट 60 कोटींपर्यंतच कामे करेल असं वर्तवण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे 180 कोटींचे बजेट पाहता, आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा एवढा कमी प्रतिसाद बघता हा चित्रपट 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करू शकणार नाही असंही बोललं जात आहे. या पूर्वी ठग्स ऑफ हिंदुस्थान हा आमिर खानचा चित्रपट फ्लॉफ ठरला होता.

हे ही वाचा – ‘जे घडणार तेच ती बोलणार’ सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -