घरमनोरंजनन्यूयॉर्कमध्ये अमिताभ आणि रणबीरचं बाँडिंग

न्यूयॉर्कमध्ये अमिताभ आणि रणबीरचं बाँडिंग

Subscribe

आता रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या बाँडिंगचे काही फोटो व्हायरल होत आहेत. अमिताभ बच्चन यांनी स्वतः आपल्या ब्लॉगवर रणबीर कपूरबरोबर न्यूयॉर्कच्या रस्त्यावर चालताना आणि सेल्फीज घेत मजा करत असल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सध्या न्यूयॉर्कमध्ये आपल्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच आलिया भट, रणबीर कपूर आणि नागार्जुन यांचे सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते. तर आता रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या बाँडिंगचे काही फोटो व्हायरल होत आहेत. अमिताभ बच्चन यांनी स्वतः आपल्या ब्लॉगवर रणबीर कपूरबरोबर न्यूयॉर्कच्या रस्त्यावर चालताना आणि सेल्फीज घेत मजा करत असल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. तर अमिताभ यांनी थोड्याच दिवसांपूर्वी टीममधील सर्व लोकांबरोबर लंच करत असलेला फोटोदेखील शेअर केला होता.

- Advertisement -

ब्रम्हास्त्रच्या सेटवरचे बरेच फोटो व्हायरल

‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झाल्यापासून चर्चेतच नाही तर सेटवरील आणि त्यातील काम करणाऱ्या कलाकारांचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत. पहिल्या दिवसापासून अयान मुखर्जी, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरूनही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळं प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाविषयी आणि या कलाकारांमधील बाँडिंगविषयी चर्चा सतत सुरु राहिली आहे. तर आलिया भटनंदेखील आपल्या इन्स्टा स्टोरीवर स्वादिष्ट खाण्याच्या पदार्थांचे फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये रणबीर कपूरचा हात दिसत आहे. या दोघांचंही बाँडिंग या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान चांगलंच असल्याचं जाणवत आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री मौनी रॉय आणि दाक्षिदात्य सुपरस्टार नागार्जुन यांचेदेखील बरेच फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. काम करत असताना सगळेच कलाकार मजा करत असल्याचंही या फोटोंवरून स्पष्ट होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -