अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदानाचा ७ ऑक्टोबरला ‘गुडबाय’

या फोटोमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम दिसून येत आहे. या फोटोवरून असं दिसून येतयं की, चित्रपटातील संपूर्ण कुटुंब एकत्र टीव्ही समोर बसून मॅच पाहत आहे. यात अमिताभ बच्चन वर सोफ्यावर बसले असून त्यांच्या शेजारी बसलेल्या रश्मिकाला ते पॉपकॉर्न देत आहेत.

बालाजी टेलीफिल्म्स आणि रिलायंस एंटरटेनमेंटचा आगामी चित्रपट ‘गुडबाय’च्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. विकास बहल यांनी दिग्दर्शिक केलेल्या गुडबाय चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, रश्मिका मंदाना, एली अवराम आणि सुनील ग्रोवर यांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत. ७ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून निर्मात्यांकडून आज या चित्रपटाचं एक फोटो शेअर करण्यात आलं आहे.

या फोटोमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम दिसून येत आहे. या फोटोवरून असं दिसून येतयं की, चित्रपटातील संपूर्ण कुटुंब एकत्र टीव्ही समोर बसून मॅच पाहत आहे. यात अमिताभ बच्चन वर सोफ्यावर बसले असून त्यांच्या शेजारी बसलेल्या रश्मिकाला ते पॉपकॉर्न देत आहेत. तर नीना गुप्ता सोफ्याच्या पुढे बसल्या आहेत. तर बाकीचे सुद्घा सोफ्याच्या आसपास बसल्याचं दिसत आहे. ‘गुडबाय’ हा चित्रपट इमोशंस आणि कॉमेडीने परिपूर्ण असणार आहे.

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त रश्मिका ‘मिशन मजनू’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दिसून येईल. त्याशिवाय रश्मिका टायगर श्रॉफसोबत देखील एका चित्रपटात दिसणार आहे. तसेच रश्मिका करण जौहरच्या ‘कॉफी विद करण 7’ मध्ये सुद्धा दिसून येईल.

याशिवाय, अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री नीना गुप्ता हे पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नीना गुप्ता या चित्रपटात अमिताभ यांच्या पत्नीची भमिका साकारणार आहेत.दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा ९ सप्टेंबर रोजी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत आलिया आणि रणबीर कपूर सुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय ते दीपिका आणि प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट k’ मध्ये सुद्धा दिसणार आहेत.सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.


हेही वाचा: “रंजना’ मधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!!