रिंकूच्या ‘मेकअप’वर अमिताभ-सलमानही झाले सैराट

अमिताभ बच्चन आणि सलमान खानने 'मेकअप' चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला.

amitabh bachchan and salman khan shared rinku rajguru movie makeup tariler on twitter
रिंकूच्या 'मेकअप'वर अमिताभ-सलमानही झाले सैराट

‘सैराट’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मेकअप’ या चित्रपटातून ती झळकार आहे. या चित्रपटातून रिंकू वेगळ्याचं अंदाजात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यातल्या रिंकूच्या अभिनयाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे रिंकूच्या अभिनयाने बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांचं देखील लक्षं वेधून घेतलं. त्यांनी रिंकूच्या ‘मेकअप’ या चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. सलमान खान यांने ‘मेकअप’ या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

७ फेब्रुवारीला गणेश पंडित दिग्दर्शित ‘मेकअप’ या चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रिंकू सोबत या चित्रपटात मुख्य भूमिकेत चिन्मय उद्गीरकर दिसणार आहे. पहिल्यांदा ही नवी जोडी एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

याशिवाय अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुख पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ आदी चेहरे या चित्रपटात झळकणार आहेत. दीपिक मुकूट, बी.बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे आता ही नवी जोडी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालते की नाही हे येत्या काळात कळेल.


हेही वाचा – तनुश्री दत्ताच्या वकिलाविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल