Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान तब्बल 17 वर्षांनंतर दिसणार एकत्र

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान तब्बल 17 वर्षांनंतर दिसणार एकत्र

Subscribe

बॉलिवूडचा विचार केला तर कोणाच्याही मनात प्रथम नाव येते ते म्हणजे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान. या दोन सुपरस्टार्सनी बॉलीवूडवर राज्य करत, आजवर प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन केलं आहे. मोजक्याच चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले आहे. या दोन महान कलाकारांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत.

एका खात्रीलायक सूत्रानुसार, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. तब्बल सतरा वर्षांनी हे दोघं एकत्र, ऐक अफलातून मनोरंजक प्रोजेक्ट करणार आहेत. याबद्दल सखोल बातम्या बाहेर आलेल्या नाहीत. परंतु लवकरच या चित्रपटाचे तपशील समोर येतील अस समजतंय.

- Advertisement -

मनोरंजन क्षेत्रासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या दोघांनी यापूर्वी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम आणि कभी अलविदा ना कहना यांसारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांना मोहित केलं होतं. आता पुन्हा एकदा ती जादू घडवण्यासाठी हे दोन महान कलाकार सज्ज आहेत.

 


हेही वाचा : ‘ड्रीम गर्ल 2’ ने केली “इतक्या” कोटींची कमाई! 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -