घरताज्या घडामोडीबीग बींचा मजुरांना मदतीचा हात; दररोज ४ हजार मजुरांना अन्नदान

बीग बींचा मजुरांना मदतीचा हात; दररोज ४ हजार मजुरांना अन्नदान

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मजुरांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वच जण लढत आहेत. मात्र, तरीही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश काही आलेले नाही. त्यामुळे राज्या राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे मजुरांचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, मजुरांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी विशेष ट्रेन देखील सोडण्यात आली आहे. मात्र, मजुरांचे होत असलेले स्थलांतर राज्यांसमोर एक मोठे संकट उभे राहू लागले असताना आता त्यांच्या मदतीकरता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. बीग बी यांनी मजुरांना घरी सोडण्यासाठी व्यवस्था केली असून ते दररोज ४ हजार ५०० जेवणाच्या पाकिटाचे वाटप करतात.

२० हजार पीपीई किट्स, मास्क आणि सॅनिटाझरचेही वाटप

मिररने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांच्यावतीने एबी कॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव मजुरांना मदत करत आहेत. त्यांनी हाजी अली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहेब ट्रस्ट यांच्या मदतीने दररोज ४ हजार ५०० मजुरांना शिजवलेल्या अन्नाच्या पॅकेटचे वाटप देखील सुरू केले आहे. त्यांनी २८ मार्चपासूनच अरब गल्ली, अन्टॉप हिल, वरळी लोट्स, माहिम दर्गा, हाजी अली दर्गा, धारावी आणि मुंबईतील काही भागात अन्न वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच त्यांनी १० हजार धान्याच्या पाकिटांचे वाटप केले आहे. तसेच रुग्णालय आणि मुंबई पोलिसांना २० हजार पीपीई किट्स, मास्क आणि सॅनिटाझरचेही वाटप करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी प्रसारमाध्यमांना या कामाची खबर लागू नये, म्हणून याचा कुठेही गाजावाजा केला नाही. बच्चन यांनी पायी जाणाऱ्या मजुरांना अन्नाची पाकिट, पाण्याची बाटली आणि चप्पल याची देखील व्यवस्था केली आहे.


हेही वाचा – Video: धर्मेंद्र यांचा फार्म हाऊस वरील ‘हा’ व्हिडिओ झाला व्हायरल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -